सिंघम,सिम्बा आणि सूर्यवंशी एकत्र येतात तेव्हा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Oct-2019
Total Views |


 

अजय देवगणच्या सिंघम, सिंघम २ तर रणवीर सिंहच्या सिम्बावर प्रेक्षकांनी कौतुकाची उधळण केली आणि दोन्ही चित्रपटांना जबरदस्त कमाई देखील मिळवून दिली. आता 'सूर्यवंशी' या आगामी चित्रपटात बॉलिवूडचा खिलाडी पोलिसांच्या या धमाकेदार टीममध्ये सामील होणार असून ही तिकडी आता जबरदस्त धमाका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

अक्षय कुमार, अजय देवगण आणि रणवीर सिंह पहिल्यांदाच एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. तिघेही एकदम तोडीचे अभिनेते असल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता खूपच वाढली आहे. शिवाय तिघांनी आपल्या आधीच्या चित्रपटांमधून प्रेक्षकांचे उत्तम मनोरंजन केले आहे त्यामुळे त्यांच्याकडून आता अपेक्षा वाढल्या आहेत.

'सूर्यवंशी' या चित्रपटाविषयी गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा रंगात होत्या. रोहित शेट्टी दिग्दर्शित चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणारे स्टंट, गाड्या या सगळ्याच रोहितचा एक विशेष टच असतो. त्यामुळे आता या तिघांची एकत्र धमाल या चित्रपटात पाहायला मिळेल. पुढील वर्षी २७ मार्चला हा धमाकेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

@@AUTHORINFO_V1@@