राज्यात १ कोटीहून अधिक तरुण मतदार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Oct-2019
Total Views |


मुंबई: महाराष्ट्रात १८ ते २५ वयोगटातील १ कोटी ६ लाख ७६ हजार १३ तरुण मतदारांची नोंदणी मतदार यादीमध्ये करण्यात आली आहे. यामध्ये ६० लाख ९३ हजार ५१८ युवक तर ४५ लाख ८१ हजार ८८४ युवती आहेत. तर यामध्ये ६११ तृतीयपंथी मतदारांची नोंदही करण्यात आली आहे.

राज्यात ४ ऑक्टोबर २०१९ पर्यंत करण्यात आलेल्या मतदार नोंदणीमध्ये ८ कोटी ९९ लाख ३६ हजार २६१ मतदारांची नोंदणी झाली आहे. या नोंदणीत एकूण ५ हजार ५६० अनिवासी भारतीयांची नोंद झाली असून यामध्ये अनिवासी भारतीय पुरुष ४ हजार ५४ आहेत तर १ हजार ५०६ अनिवासी भारतीय महिलांची नोंद आहे.

मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क तर आहेच पण कर्तव्य सुद्धा आहे हे प्रत्येकानी लक्षात घेणे गरजेचे आहे. लोकसभा निवडणुकांच्या वेळी देखील पक्ष, मतदार संघ, उमेदवार या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन नागरिकांनी मतदान केल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे आता विधानसभा निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त मतदान व्हावे आणि योग्य उमेदवार निवडून यावा ही सर्वांसाठीच फायद्याची गोष्ट आहे.

@@AUTHORINFO_V1@@