मयंक अग्रवालने जिंकली क्रिकेटप्रेमींची मने

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Oct-2019
Total Views |



डोक्याला गंभीर दुखापतीनंतरही ठोकले दमदार शतक

पुणे : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांच्या कसोटी सामन्यांचा दुसरा सामना आज पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून टीम इंडिया प्रथम फलंदाजीस आली. रोहित शर्मासोबत आपल्या खेळाची सुरुवात करत त्याने हे शतक पूर्ण केले. मयंकच्या शतकी खेळीने अर्ध्यादिवसातच भारताने २०० धावांचा टप्पा पार केला आहे. मयंक अग्रवालने शानदार खेळी कायम ठेवत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शतक झळकावले. हे मयंकच्या कसोटी कारकीर्दीचे दुसरे शतक होते. मयंक अग्रवालने १०८ धावांची खेळी केली. त्या दरम्यान त्याने १६ चौकार आणि २ षटकार लगावले.




 

मयंक अग्रवाल हा भारताकडून दुसरा कसोटी सामना खेळत आहे. विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात मयंक अग्रवालने पहिले शतक झळकावले होते. परंतु या सामन्यात त्यांनी दुहेरी शतक करत २१५ धावा केल्या. त्या दरम्यान त्याने २३ चौकार आणि ६ षटकार लगावले. विराट कोहली (४५ धावा) आणि अजिंक्य रहाणे (१२ धावा) करत मैदानावर आहेत. ३ गडी गमावल्यानंतर भारताने आत्तापर्यंत २४९ धावा केल्या. आतापर्यंत फक्त पाच आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळलेल्या मयांकच्या नावावर दोन शतके आणि तीन अर्धशतके आहेत.

@@AUTHORINFO_V1@@