बॅलेट पेपरवर निवडणूक का नको ? वाचा सविस्तर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Oct-2019
Total Views |




मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या घोषणेपूर्वी विविध राजकीय पक्षांनी बॅलेट पेपर निवडणूक घेण्याची मागणी केली होती. ईव्हीएममध्ये घोळ असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. अनेकांनी तर निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याची भाषाही केली होती. मात्र, याप्रकारावर निवडणूकीत आयोगाकडून ईव्हीएमबद्दल जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्यात आला होता.

 

आपण मतदान केलेल्या पक्षालाच मत मिळाले कि नाही हे सांगणाही व्हीव्हीपॅट यंत्रणा लोकसभा निवडणूकांपासून अंमलात आणण्यात आली होती. तरीही ईव्हीएमला विरोध सुरू होता. महाराष्ट्र विधानसभा निवणूकांपूर्वी आता महाराष्ट्र निवडणूक आयोगानेही ईव्हीएमबद्दल आणि मतदानाबद्दल जनजागृती अभियान राबवले आहे.

 

दरम्यान, बॅलेट पेपरवर निवडणूक का नको, याचा खुलासा खुद्द निवडणूक आयोगानेच केला आहे. बॅलेटपेपरवर मतदान करताना एका मतदार संघात किमान दोन हजारमते अवैध नोंदवली जातात, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. यात शिक्क्याची शाई, फाटलेला कागद किंवा मोजणीमध्ये मानवी हस्तक्षेप किंवा चुकांची शक्यता नाकारता येत नाही, असे आयोगाने म्हटले आहे. त्यामुळे व्हीव्हीपॅट पद्धत समजून घ्या, सत्यता जाणा, खात्री करा आणि निश्चिंत व्हा!, असे आवाहन केले जात आहे.

 

या प्रकरणातील प्रात्यक्षिके निवडणूक आयोगातर्फे यापूर्वी दाखवण्यात आली होती. ईव्हीएम आणि व्हिव्हीपॅटच्या चौकशीसाठी 1950 या क्रमांकावर टोल फ्री संपर्क करण्याचे आवाहान मतदारांना करण्यात आले आहे. किंवा https://ceo.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.

@@AUTHORINFO_V1@@