शरणार्थे!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Oct-2019   
Total Views |






तुर्कस्थानासाठी युद्धशरणार्थींचा प्रश्न आहेच
. पण, काही तज्ज्ञांच्या मते तुर्कस्थानचे सीरियात काही अन्य हितसंबंधदेखील गुंतले आहेत. तुर्कीच्या या निर्णयानंतर अमेरिकेसह जगभरातील अनेक देशांतून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या.



तुर्कस्थानने सीरियाच्या सीमारेषा अखेर ओलांडल्या आहेत
. ही घटना घडली आणि जगभरात एकच खळबळ माजली. हल्ला करून सध्या तुर्कस्थानात आश्रय घेतलेल्या सीरियन युद्धशरणार्थींसाठी ‘सेफ झोन’ बनवून देत असल्याचे तुर्की सांगत आहे. अशा युद्धशरणार्थींची संख्या ही जवळपास 20 लाखांहून अधिक असल्याचे समजते. तुर्कस्थानासाठी युद्धशरणार्थींचा प्रश्न आहेच. पण, काही तज्ज्ञांच्या मते तुर्कस्थानचे सीरियात काही अन्य हितसंबंधदेखील गुंतले आहेत. तुर्कीच्या या निर्णयानंतर अमेरिकेसह जगभरातील अनेक देशांतून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने तुर्कस्थानच्या कारवाईबाबत चिंता व्यक्त केली, तर एकंदर वैश्विक पटलावर तुर्कीने सीरियावर केलेला हल्ला अस्थिर आखाती परिस्थितीची जाणीव करून देणारा आहे.



सीरियातील
‘इसिस’चा प्रभाव दिवसेंदिवस कमी होत आहे. सीरियातील दहशतवादविरोधी, लोकशाहीप्रेमी काही दले ‘इसिस’ विरोधात लढत असल्याच्या बातम्या आपण ऐकत होतो. त्यांच्या या लढ्याला बर्‍यापैकी यशही मिळत होते. पण, अचानक तुर्कीने अतिक्रमण केल्याच्या बातम्या आल्या. भूमध्य समुद्राच्या आजूबाजूचे राजकारण आणि तिथल्या युद्धजन्य परिस्थितीची जगाला तशी सवय झाली आहेच. कट्टर इस्लामिक दहशतवाद आणि सतत साम्राज्यवादी मानसिकतेचे दुष्परिणाम तुर्की, सीरियासारख्या देशांमध्ये अनुभवायला मिळतात. भूमध्य समुद्राच्या आजूबाजूच्या प्रदेशासाठी हे नवे नाही. सीरिया-इस्रायल युद्धाचा इतिहासही अनेकांना माहीत आहे. अलीकडल्या काळात अमेरिकेकडून शस्त्रास्त्रे वगैरे खरेदी करू लागलेल्या तुर्कीवर आता अमेरिकेनेच निर्बंध लादायचा विचार सुरु केला आहे. तुर्की मात्र अधिकृत व्यासपीठावरून ‘युद्ध शरणार्थी व सीरियातील दहशतवादी कारवाया’ हे कारण देतोय. शेवटी तुर्कीचे ढोंग जगजाहीर आहेच. कारण, सीरियातील घडामोडींकडे जगाचे लक्ष होते. तिथे गेल्या काही दिवसांतील स्थिती काय होती, हे गुपित कोणापासून लपून राहिलेले नाही.



जवळपास जगाच्या मध्यावर असलेले हे देश
. त्यामुळे इथे घडणार्‍या घटनांचा अप्रत्यक्ष परिणाम सर्व जगावरच होत असतो. तुर्कांनी ताब्यात घेतलेल्या बंदरांमुळे युरोपला आशियामध्ये प्रवेशासाठी नवा मार्ग शोधावा लागला होता. मध्ययुगीन जगाच्या इतिहासाला याच घटनेने नवे वळण मिळाले होते. विसाव्या शतकात शक्तिशाली होत असलेल्या सीरियाने असाच आक्रमणाचा प्रकार इस्रायलच्या बाबतीत केला होता. ‘सिक्स डे वॉर’चा इतिहास अजून जग विसरलेले नाही. अशातच एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीच इस्लामिक दहशतवादाच्या विळख्यात सीरिया पुरता अडकून गेला. इस्लामिक दहशतवादातून मुक्त होईल असे वाटत असतानाच सीरिया पुन्हा अस्थिरच राहणार का, अशी भीती त्यामुळे निर्माण झाली आहे. वस्तुतः हे तुर्कीचे आक्रमण असले तरीही त्याचे तात्त्विक समर्थन करण्याचा उद्दामपणा त्यांनी केला आहेच. तुर्की असे करू शकला, यासाठी जगभरातील छद्म उदारमतवाद्यांना जबाबदार धरायला हवे. युद्धशरणार्थींच्या प्रश्नावर एकांगी भूमिका घेणारे बुद्धीजीवी याला जबाबदार आहेत. कारण, सततच्या एकांगी भूमिकेला कंटाळून शेवटी लोक टोकाचा एकस्वी विचार करू लागतात. एखाद्या प्रश्नाचे वास्तववादी दृष्टिकोनातून आकलन न करता, वरवर सुखावह वाटणारी मूल्ये लादली गेली.



त्यातून युद्धशरणार्थ्यांच्या विरोधात एक विचित्र असंतोष मूळ धरू लागला होता
. शरणार्थींना परत पाठविण्यासाठी ‘सेफ झोन’ बनवू इच्छितो, अशी भूमिका तुर्की आज छातीठोकपणे घेण्याची हिंमत का करू शकला, यामागील कारणे शोधली पाहिजेत. हा तुर्कीचा आशावाद आहे की, शरणार्थी समस्येला कंटाळलेला जनसमुदाय व पर्यायाने देशांना, तुर्कीविषयी सहानभूती वाटू शकेल. त्यातून स्वतःच्या साम्राज्यवादाचे तात्त्विक समर्थनही होऊ शकते. अनेक मुख्य प्रवाहातील माध्यमे व बुद्धिवंत युद्ध शरणार्थींचा विषय एकतर्फी मांडत आलेले असल्यामुळे, त्यांची विश्वासार्हता याबाबतीत संपलेली आहे. त्यामुळे युद्धशरणार्थी समस्येने ग्रासलेला कोणताही देश सर्वप्रथम तुर्कांच्या या आक्रमणाचा सहानभूतीपूर्वक विचार करेल. तुर्कीच्या संभाव्य समर्थकांचे मन वळविणेही अवघड असणार आहे. भारताने तुर्कीच्या साम्राज्यवादाला विरोध करण्याची अधिकृत, डोळस भूमिका घेतली. तुर्कीला स्वतःच्या भूमिकेचे समर्थन करण्यास पुरेपूर वाव मिळतो, त्याचे कारण म्हणजे कथित उदारमतवादी, पुरोगाम्यांनी घेतलेल्या एकांगी भूमिका. कारण, वास्तव सोडून बोलणार्‍यांवरचा लोकांचा विश्वास उडतो व अशी मंडळी वास्तव मांडू लागली, तरीही लोक त्यावर विश्वास ठेवण्यास तयार होत नाहीत.

@@AUTHORINFO_V1@@