महाडमध्ये पुन्हा पारंपरिक लढत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Oct-2019
Total Views |




महाड विधानसभा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात एकूण ८ उमेदवार आहेत
. मात्र प्रमुख लढत ही शिवसेनेचे विद्यमान आमदार भरत गोगावले आणि काँग्रेसचे माणिकराव जगताप यांच्यामध्ये होणार असून उर्वरित सहा उमेदवार किती व कोणाची मते घेणार, यावर या दोघा प्रतिस्पर्ध्यांमधील लढत अवलंबून असणार आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या मतदार संघात गेल्या ४ दशकांची राजकीय कारकीर्द पाहिल्यास महाड तालुक्यात १९८० व २००४ या दोन निवडणुकांचा अपवाद वगळता काँग्रेसविरोधी कौल महाड-पोलादपूर -माणगावमधील मतदारांनी दिल्याचे पाहावयास मिळते.



महाडचे शिवसेना
-भाजपचे विद्यमान आमदार भरत गोगावले यांची सलग तिसर्‍यांदा काँग्रेसचे नेते माणिकराव जगताप यांच्याशी लढत होत असून मागील दोन लढतींमधील विजयाच्या वाढलेल्या आकड्यांनी शिवसेनेचे मनोधैर्य बळावले आहे. याउलट मागील २ लढतीतील अपयशाने खचून न जाता काँग्रेस पक्षाने यावर्षी पुन्हा एकदा मोठ्या जोमाने तयारी केल्याचे चित्र पाहावयास मिळत आहेमहाडच्या राजकारणात शेतकरी कामगार पक्षाने घेतलेली यावेळची भूमिका ही अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असून या आधीच्या ३ निवडणुकांमध्ये माणिक जगताप यांना खुलेपणाने शेकापचे जयंत पाटील यांच्याकडून कोणतीही मदत झाली नसल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे मागील २ निवडणुकीतील काँग्रेसचे माणिक जगताप व राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्यातील सुप्त संघर्षाचा परिणाम जगतापांना राजकीय पटलावर सहन करावा लागला होता. या दोन मातब्बर नेत्यांमध्ये असलेला संघर्ष, कथित गैरसमजाचा फायदा युतीला होऊन या निवडणुकांमध्ये यश प्राप्त करण्यात विद्यमान आमदार आणि शिवसेनेचे उमेदवार गोगावले यशस्वी ठरले होते.



माणिकराव जगताप यांना विधानसभेत पाठविण्याकरिता आ
. जयंत पाटील, खा. सुनील तटकरे या दोन रायगड जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांनी केलेली तयारी काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविणारी ठरली. यामुळे आगामी निवडणुकीतील ही लढाई शिवसेनेकरिता राजकीय प्रतिष्ठेची तर काँग्रेसकरिता अस्तित्व सिद्ध करणारी ठरेल. गेल्या पाच वर्षांत शिवसेनेचा आमदार म्हणून महाड मतदारसंघात कोट्यवधीची विकासकामे केल्याचा दावा आमदार भरत गोगावले यांनी केला आहे. भरत गोगावले यांना पुन्हा विजयी करून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्षाला अस्मान दाखविण्याचा निर्धार युतीतील कार्यकर्त्यांनी केला आहे.



 - आनंद जाधव
@@AUTHORINFO_V1@@