पाकिस्तानात पुन्हा हिंदू मुलीचे जबरदस्ती धर्मांतर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Oct-2019
Total Views |



सिंध
: पाकिस्तानच्या सिंध प्रांतात आणखी एका हिंदू मुलीचे जबरदस्तीने इस्लाम धर्मांतर झाले. हि मुलगी सिंध प्रांतातील टंडो मोहम्मद खान येथील रहिवासी असून या मुलीचे नाव पायल आहे. पायलच्या कुटुंबीयांनी सांगितले की
, मुस्लिम तरुणांनी प्रथम तिचे अपहरण केले, नंतर तिचे धर्मांतर केले. कुटुंबीयांनी पोलिसात एफआयआरही दाखल केली आहे. पाकिस्तानमध्ये हिंदू मुलींसोबत वारंवार अशा घटना घडत आहेत. गेल्या महिन्यात सिंधमध्ये राहणाऱ्या वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी नम्रता हिचा देखील इस्लामचा स्वीकार न केल्यामुळे हत्या करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले होते. दरवर्षी पाकिस्तानात १२ ते २८ वयोगटातील सुमारे १ हजार मुलींचे अपहरण केले जाते. या सर्व घटनांवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान कधीही प्रतिक्रिया देत नाहीत.

 

 


दरवर्षी सुमारे १ हजार सिंधू मुलींचे सक्तीने धर्मांतर केले जाते. 


अमेरिकेच्या सिंधी फाऊंडेशनने म्हटले आहे की ,"दर वर्षी १२ ते २८ वयोगटातील सुमारे १ ते १००० सिंधू मुलींचे अपहरण केले जाते. त्यानंतर त्यांना जबरदस्तीने धर्मांतरित करून त्यांचे मुस्लिम तरुणांशी लग्न झाले.केवळ हिंदूच नव्हे तर शीख आणि ख्रिस्ती धर्मातील मुलीही पाकिस्तानमध्ये सुरक्षित नाहीत. पाकिस्तानमधील हिंदू मुलींबरोबरच शीख आणि ख्रिस्ती धर्मातील मुलींचेही अपहरण केले जाते आणि त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले जाते. पाकिस्तानने १४ वर्षात ७ हजार ४३० सिंधू मुलींचे अपहरण झाल्याच्या प्रकरणांची नोंद असल्याचे मान्य केले आहे. पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाच्या म्हणण्यानुसार, जानेवारी २०१४ ते मे २०१८ या कालावधीत सिंधू मुलींच्या अपहरणाचे ७ हजार ४३० गुन्हे दाखल झाले आहेत. आणि ही आकडेवारी फक्त तक्रार दाखल झालेल्या प्रकरणांची असल्याचेही त्यांनी सांगितले. याखेरीज अशी अनेक प्रकरणे आढळून आली आहेत, ज्याची आजपर्यंत नोंद झाली नाही. या सर्व घटना घटना घडत असताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान जागतिक व्यासपीठावर काश्मीरमधील तथाकथित व्यापक अत्याचारांच्या आरोपासाठी चीनचे समर्थन शोधण्यासाठी बीजिंगमध्ये आहेत.

 

@@AUTHORINFO_V1@@