शेअर बाजार सलग तिसऱ्या दिवशी गडगडला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Oct-2019
Total Views |


मुंबई : वित्तीय क्षेत्रातील चिंता, आंतरराष्ट्रीय बाजाराचा दबाव आणि कच्च्या तेलाचे वाढते दर याचा एकत्रित परिणाम शेअर बाजारावर जाणवला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ३६१ अंशांच्या घसरणीसह ३८ हजार ३०५. ४१ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ११४.५५ घसरणीसह ११ हजार ३५९.९० वर बंद झाला.

 

येस बॅंकेचा शेअर सर्वाधिक २२.८० टक्क्यांनी घसरला. इंडसइंड बॅंक ६.३० टक्के, भारतीय स्टेट बॅंकेचा शेअर ५.५० टक्के, भारती एअरटेल ४.३२ टक्के, ओएनजीसी, टाटा स्टील, रिलायन्स, आयसीआयसीआय बॅंक आदी शेअर दोन टक्क्यांनी घसरले. एचडीएफसी बॅंक सर्वाधिक १.७२ टक्क्यांनी वधारला. महिंद्रा अॅण्ड महिंद्रामध्ये १.७१ टक्के आणि मारुति सुझुकी व एचडीएफसी हे दोन्ही शेअर 0.९९ टक्क्यांनी वधारले.

@@AUTHORINFO_V1@@