हिरकणीच्या शौर्यगाथेची झलक पहा या टीजरमध्ये

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Oct-2019
Total Views |


 

'हिरकणी' ची शौर्यगाथा, तिच्या धाडस आणि पराक्रमाची कथा सर्वांनाच परिचित आहे. आता तोच काळ पुन्हा एकदा आपल्या डोळ्यासमोर तरळणार आहे 'हिरकणी' या प्रसाद ओक दिग्दर्शित आगामी चित्रपटातून. या चित्रपटाचा टीजर आज प्रदर्शित झाला. तिन्हीसांजेनंतर गडावरील दरवाजे बंद झाल्यावर घरी एकट्याच राहिलेल्या आपल्या तान्ह्या बाळाच्या आठवणीने व्याकुळ झालेली माऊली हिरकणी त्याच्यापाशी पोहोचण्यासाठी जीवाचे रान करते. तिचा तो खडतर प्रवास या टीजरमध्ये दाखवण्यात आला आहे.

टीजरमधील हिरकणीच्या ममतेची झलक पाहिल्यावर एकीकडे डोळ्यात पाणी येते तर तिचे शौर्य आणि निडरता बघून दुसरीकडे अंगावर काटा येतो. प्रसाद ओक यांनी या चित्रपटासाठी घेतलेली विशेष मेहेनत या छोट्याशा टीजरमधूनसुद्धा झळकत आहे.

हिरकणीच्या शौर्यगाथेवरचा हा चित्रपट २४ ऑक्टोबरला प्रदर्शित होईल. कच्चा लिंबू चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केल्यानंतर प्रसाद ओक यांच्या हा दुसरा चित्रपट आहे. महाराजांनी गौरवलेल्या एका प्रेमळ आईची साहसकथा "हिरकणी" या चित्रपटात साकारल्याचे प्रसाद ओक यांनी आपल्या सोशल मीडियावर म्हटले होते. त्यानुसार आता या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळते का हे पाहणे खूपच औत्सुक्याचे ठरेल.

@@AUTHORINFO_V1@@