शिवसेनेची रणनीती ; जुन्यांना डावलून नव्यांना संधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Oct-2019
Total Views |



मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेने युती जाहीर केल्यानंतर दोन्ही पक्षाने पहिली यादी जाहीर केली. शिवसेनेने पहिल्या यादीमध्ये ७० उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढणार आहेत. इतर मतदार संघांमधून जुन्या नेत्यांना डावलून शिवसेनेने नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. तर काही नेत्यांच्या जागा बदल्याण्यात आल्या आहेत.

 

माजी आमदार विनोद घोसाळकर यांना यावेळेस दहिसरऐवजी श्रीवर्धन येथून उमेदवारी देण्यात आली आहे. तर मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे वांद्रे पूर्व विधानसभेसाठी इच्छूक असल्याने विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांना तूर्तास प्रतीक्षा करावी लागणार आहे. याव्यतिरिक्त शिवसेनेने अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. पक्षात नव्याने प्रवेश केलेल्या नेत्यांना प्राधान्य दिल्याचे नव्या यादीमध्ये दिसून आले.

 

नगरसेविका यामिनी जाधव यांना भायखळा मतदारसंघातून, विठ्ठल लोकरेंना गोवंडी, अंधेरी पूर्वेतून रमेश लटके आणि मुंबादेवीतून पांडुरंग सकपाळ या नव्या चेहऱ्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अपेक्षेप्रमाणे नालासोपारा मतदारसंघ सोडण्यात आला असून काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या अब्दुल सत्तार यांना सिल्लोडमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

@@AUTHORINFO_V1@@