सीमा भागात पुन्हा ‘मराठी’वर अन्याय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Oct-2019
Total Views |



मुंबई : कर्नाटकातील मराठी सीमा भागावर अन्याय करण्याचे सत्र प्रशासकीय रेल्वेनेही कायम ठेवले आहे. मुंबईहून बेळगाव-धारवाड येथे जाण्यासाठी सर्वात सोयीच्या असलेल्या आणि पाच वर्षांपूर्वी प्रवाशांच्या आग्रहामुळे सुरू झालेल्या ‘मुंबई-हुबळी एक्सप्रेस’चे ‘मुंबई-गदग एक्सप्रेस’मध्ये विलीनीकरण करण्यात आले आहे.

 

मुंबईतून सीमाभागात जाण्यासाठी सोयीच्या गाड्या नाहीत. बेळगाव-धारवाडवरून जाणार्‍या ‘चालुक्य एक्सप्रेस’ आणि ‘शरावती एक्सप्रेस’ या सर्व रेल्वे गाड्या अत्यंत दूरवर थेट तामिळनाडूत किंवा म्हैसूरला जाणार्‍या आहेत. या गाड्यांना बेळगाव-धारवाड भागात जाण्यासाठी किंवा येण्यासाठी कधीच आरक्षण मिळत नाही. बेळगाव-धारवाड, हुबळी ते थेट शिरसीसारख्या बागायती भागातून मुंबईत मोठ्या प्रमाणावर व्यापार चालतो.


या भागातून अनेक मूळ मराठी कुटुंबांचे नातेवाईक मुंबईत राहतात. त्यामुळे प्रवाशांच्या आग्रही मागणीमुळे पाच वर्षांपूर्वी रेल्वेने ‘हुबळी-मुंबई एक्सप्रेस’ सुरू केली होती. मात्र, आता दि. पाच ऑक्टोबरपासून अचानक ही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असलेली गाडी बॅण्ड करून या गाडीचे विलीनीकरण ‘गदग एक्सप्रेस’मध्ये करण्यात येत आहे. बेळगावमधून कर्नाटकच्या अन्य भागत जाण्यासाठी भरपूर रेल्वेसेवा उपलब्ध आहेत. मात्र, धारवाड-हुबळी-बेळगाव या भागातून मुंबईत येण्यासाठी सोयीची रेल्वेसेवा उपलब्ध नाही. त्यामुळे या निर्णयाबद्दल सीमाभागात नाराजी व्यक्त होत आहे.

@@AUTHORINFO_V1@@