आजच्या काळात प्रत्येकाने गांधींचे विचार समजून घेण्याची गरज : रमेश पतंगे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Oct-2019
Total Views |



मुंबई : "देशकल्याणासाठी ज्या ज्या महापुरुषांनी कार्य केले, ते सर्व महापुरुष माझ्यासाठी वंदनीय आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी हे त्यातील एक महापुरुष आहेत. 'गांधी समजून घेताना' मला त्यांच्या जीवनाचे विविध पदर लक्षात आले. गांधीजी हे विसाव्या शतकातील महान महापुरुष आहेत. त्यामुळे आजच्या काळात प्रत्येकाने महात्मा गांधी यांचे विचार समजून घेतले पाहिजे," असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक आणि हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे यांनी मंगळवारी केले.

 

रमेश पतंगे लिखित 'गांधी समजून घेताना' या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. सुरेश हावरे आणि संदेश महाविद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. हिंदुस्थान प्रकाशन संस्था आणि स्वयं महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता, संदेश महाविद्यालय, विक्रोळी (पूर्व) येथे हा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर लेखक आणि विचारवंत रमेश पतंगे, प्रा. आशा पाटील, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद शेजवळ, भरतकुमार तांबिले उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना हावरे म्हणाले की, "महात्मा गांधींनी आपल्या जीवनात नुसते विचार मांडले नाही, तर ते स्वत: अंगीकारले. त्यामुळे गांधीजी व्यक्ती नाही, तर एक विचार आहे. हा विचार रमेश पतंगे यांच्या 'गांधी समजून घेताना' पुस्तकात वाचायला मिळतो. महात्मा गांधी यांच्या जीवनात अनेक अडचणी आल्या. या अडचणींशी संघर्ष करताना त्यांनी कधीही हिंसेचा वापर केला नाही, उलट संपूर्ण आयुष्यात अहिंसेचा विचार केला." हा विचार विविध घटनाप्रसंगात कसा उतरत गेला, याचे कथन हावरे यांनी केले." 'गांधी समजून घेताना' पुस्तकाची भाषा सहजसोपी अशी असून सामान्य वाचकाला सहज समजणारी आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल," असेही हावरे यांनी सांगितले.

 

प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे म्हणाले, "रमेश पतंगे यांनी आपल्या पुस्तकात महात्मा गांधींसारखा अवघड विषय सहजसोपा करून सांगितला आहे. विशेष म्हणजे, संघ परिवारातील एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने गांधी समजून सांगितले आहे, हे अधिक महत्त्वाचे आहे. सर्व गोष्टींची योग्य सांगड घालून लेखक रमेश पतंगे यांनी अत्यंत कुशाग्र बुद्धीने गांधी हा विषय लोकांसमोर आणला आहे."याप्रसंगी प्रा. आशा पाटील, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद शेजवळ, भरतकुमार तांबिले आदींनी आपल्या भाषणातून महात्मा गांधींच्या विचाराचे महत्त्व विशद केले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात 'सा. विवेक'चे सह कार्यकारी संपादक रवींद्र गोळे यांनी हिंदुस्थान प्रकाशन आणि 'सा. विवेक'च्या विविध आयामांची माहिती सांगितली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार योगिता साळवी यांनी ,तर आभारप्रदर्शन 'विवेक' पुस्तक विभागाच्या शीतल खोत यांनी केले. यावेळी 'साप्ताहिक विवेक'चे राहुल पाठारे यांच्यासह विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.यासोबतच मदनमोहन कुशवाह, सुरेश यादव, राम प्रकाश गुप्ता, आसिफ कुरेशी, नरेश कुडासकर, योजना ठोकळे, ज्योती जक्का, स्मिता कवडेंसह स्थानिक विचारवंत, साहित्यिक उपस्थित होते. आभारप्रदर्शन शीतल खोत यांनी केले.

@@AUTHORINFO_V1@@