दंडा ऐवजी व्यावहारिक मार्ग वापरा : गिरीश बापट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jan-2019
Total Views |

 

 
 
 
 
 
 
पुणे : नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून पुण्यामध्ये हेल्मेटसक्ती वाहतूक पोलीसांनी लागू केली. सध्या पुण्यात या हेल्मेट सक्तीला पुणेकर मोठ्या प्रमाणावर विरोध करत आहेत. याप्रकरणी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आपले मत व्यक्त केले आहे. “वाहन चालवताना हेल्मेट न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करताना वाहतूक पोलीसांनी त्यांना दंड आकारू नये. त्याऐवजी पोलीसांनी व्यावहारिक मार्ग वापरायला हवा. असे गिरीश बापट यांनी म्हटले.
 

पुण्यामध्ये गल्लीबोळातून ते अरुंद रस्त्यांपर्यंत सर्वत्र दिवसभर वाहनांची रेलचेल असते. या वाहनांमध्ये दुचाकींचे प्रमाण जास्त असते. अनेक महिला दुचाकींवरून त्यांच्या मुलांना शाळेत सोडायला जात असतात. तेव्हा त्यांच्या दुचाकीचा वेग कमी असतो. अशावेळी त्यांनी हेल्मेट घातला नसल्यास वाहतूक पोलीसांनी त्यांच्यावर कारवाई करताना त्यांच्याकडून दंड न आकारता, व्यावहारिक मार्ग वापरावा. नागरिकांमध्ये हेल्मेट आणि सुरक्षेविषयी प्रबोधन कसे सहोईल यावर वाहतूक पोलीसांनी भर द्यावा. असे गिरीश बापट म्हणाले.

 

महामार्गांवरील वाहतूकींबाबत बोलताना गिरीश बापट म्हणाले की, राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गावर वाहनांचा वेग खूपच जास्त असतो. गेल्या वर्षभरात पुणे शहारामध्ये झालेल्या अपघातांमध्ये २७५ वाहनचालकांचा मृत्यू झाला. डोक्याला मार लागल्यामुळे या वाहनचालकांचा मृत्यू झाला होता. असे समोर आले आहे. त्यामुळे महामार्गावर हेल्मेटसक्ती ही व्हायलाच हवी. वाहनचालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे गरजेचे आहे. तसेच हेल्मेटसक्ती हा न्यायालयाने दिलेला निर्णय आहे आणि न्यायालयाचा निर्णय हा कायदा असतो. त्यामुळे यावर अधिक चर्चा न करता पुणेकरांनी आपल्या हिताच्या दृष्टीने याबाबत योग्य निर्णय घ्यावा. असे आवाहन गिरीश बापट यांनी पुण्यातील नागरिकांना केले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@