'या' पत्राने उघडे पडेल 'रोम' आणि 'रागा'चे पितळ

    06-Jan-2019
Total Views |



नवी दिल्ली - "आपल्याकडे ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यातील मध्यस्थ आरोपी ख्रिस्तियन मिशेल यांनी लिहिलेले एक पत्र आहे." असा खुलासा भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. या पत्रातून 'रोम' आणि 'रागा'चे पितळ उघडे होईल, असेही पात्रा म्हणाले.

 

पत्रकार परिषदेत पात्रा यांनी मिशेलने लिहिलेले पत्र वाचून दाखविले. "या पत्रात मिशेलने म्हटले आहे की, करारातील सर्व अडचणी दूर करण्यात आल्या आहेत. मिशेलने हजारो पत्र लिहिले होते. त्याने भारतात राहूनही ही पत्रे लिहिली होती. मिशेल या प्रकरणात दलाल म्हणून भारतात राहत असताना ऑगस्टा वेस्टलँडच्या सीईओंना पत्र लिहित होता." असेही पात्रा यांनी सांगितले.

 

"आमच्या काही संस्थांना यामधील पत्रे मिळाली आहेत. आम्हाला माध्यमांच्या मदतीनेही एक पत्र मिळाले. या पत्रामुळे 'रोम' आणि 'रागा' यांच्यामागील कहानीही उघड होईल." असेही पात्रा म्हणाले. आरोपी मिशेल हा ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणातील मध्यस्थ असून त्याच्यावर या प्रकरणात लाच स्वीकारल्याचा आरोप आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/