आगामी निवडणुकीमध्ये २०१४पेक्षा अधिक मतांनी निवडून येईल भाजप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jan-2019
Total Views |




लातूर : आगामी निवडणुकांमध्ये २०१४ पेक्षा जास्त मताधिक्याने भाजपचा विजय होणार आहे, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. शहरात आयोजित बूथ विजय अभियानाच्या दुसऱ्या सत्रात ते बोलत होते. अभियानस्थळी अमित शाह दाखल होताच कार्यकर्त्यांनी 'जय भवानी, जय शिवाजी'च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. त्यावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह आणि देशातील वातावरणातून पाहून भाजप पुन्हा विजयी होईल, असे शाह म्हणाले. तसेच युतीचा निर्णय हा अध्यक्ष घेतील परंतु स्वबळावरही विजय निश्चित असल्याचा विश्वास मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

 

रविवारी शहरामध्ये भाजपच्या वतीने ४ जिल्ह्यातील बूथ विजय अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. दोन सत्रामध्ये होणाऱ्या या अभिनयाला भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रेदशाध्यक्ष रावसाहेब दानवे, सुजितसिंह ठाकूर, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची उपस्थिती होते. या अभियानाच्या माध्यमातून बुथप्रमुखांना स्थानिक पातळीवर राबवण्यात येणाऱ्या यंत्रणेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

 

दरम्यान, कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात 'फिर एक बार मोदी सरकार' या घोषणेने मुख्यमंत्र्यांनी भाषणाची सुरुवात केली. "चारही लोकसभा मतदार संघ निवडून आणण्याची जबाबदारी ही बूथप्रमुखांची आहे. सोशल भरवश्यावर ही निवडणूक होणार आहे परंतु त्यावर अवलंबून न राहता दारोदार जाऊन राबवलेल्या योजनांची माहिती द्या विजय निश्चित आहे.एकहाती सत्ता घ्यायची असेल तर गतनिवडणुकीपेक्षा केवळ २ कोटी मताधिक्याची गरज आहे आणि योजनेचा लाभ झालेल्यांची संख्या ही २ कोटीहून अधिकची आहे. त्यामुळे पारदर्शक काराभराप्रमाणेच प्रचारातही पारदर्शकता राबवा." असा सूचक सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला. युतीचा निर्णय अध्यक्ष घेतील परंतु स्वबळावरही आपण जिंकू शकतो हे विश्वास आहे. दुष्काळाशिवाय सर्व प्रकारची मदत एप्रिलपूर्वीच केली जाणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@