हिंदु राष्ट्र जागृती सभेसाठी वाहनफेरी

    05-Jan-2019
Total Views |



पनवेल : हिंदु जनजागृती समितीने ६ जानेवारीला हिंदु राष्ट्र जागृती सभेचे आयोजन केले आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर हिंदू धर्मप्रेमींनी वाहनफेरी काढत सभेला समस्त हिंदूंना उपस्थित रहाण्याचे आवाहन केले आहे. ४ जानेवारीला सायं. ५ वाजता येथील बसस्थानकाजवळील ओरीयन मॉल जवळून वाहनफेरीला प्रारंभ झाला. यावेळी स्वराज्य मावळा प्रतिष्ठान, बजरंगदल, मल्हार मित्रमंडळ पनवेल, कोळीवाडा समाज, करणी सेना, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सनातन संस्था, नारीशक्ती फाऊंडेशन यांसह अन्य संघटनांचे प्रतिनिधी दुचाकी घेऊन सहभागी झाले होते.

 

गावदेवी मंदिर-सावरकर चौक-टिळक रोड-उरणनाका-भाजप कार्यालय या मार्गाने काढण्यात आलेल्या या फेरीची सांगता शिवाजी चौक येथे झाली. या वाहनफेरीत दुचाकी आणि चारचाकी वाहनांसह एकूण १३० वाहने सहभागी झाली होती. वाहनफेरीद्वारे ध्वनीक्षेपकाद्वारे उद्घोषणा करून सभेचे निमंत्रण देण्यात आले. ६ जानेवारीला पनवेल येथील मिडल क्लास सोसायटीच्या मैदानात सायं. ५ वाजता ही सभा पार पडणार आहे. या सभेला सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक, लष्कर-ए-हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल मार्गदर्शन करणार आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/