गायीच्या शेणावर चालणार टोयोटाची कार!

    04-Jan-2019
Total Views |



मुंबई : आपल्या संस्कृतीमध्ये गायीला अनन्य साधारण महत्व आहे. गायीसंबंधित प्रत्येक गोष्टीचे महत्व अगदी प्राचीन काळापासून सांगितले जाते. याला शेणही अपवाद नाही. अलीकडच्या काळात गायीच्या शेणाचा आणि गोमुत्राची दाखल संपूर्ण जगाने घेतली असून जगभरात याचा वापर मोठ्याप्रमाणात वाढला आहे. गायीच्या शेणाचा ग्रामीण भागात विंधन म्हणून केला जात असताना आता चक्क जगप्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी टोयोटाने गायीच्या शेणावर चालणारी कार बाजारात आणली आहे. मिराई असे या कारचे नाव असून जपानच्या टोयाटो मोटर्सने या कारच्या जाहिरातीदेखील सुरु केल्या आहेत.

 

गायीच्या शेणापासून वेगळ्या केलेल्या हायड्रोजनवर ही कार चालणार आहे. एवढेच नाही तर ही कार सर्व इंधनांवर चालू शकणार आहे. हायड्रोजन पॉवर फयूएलवर चालणार्‍या या पहिल्याच कारचे प्रॉडक्शन सुरु केले जात असल्याचे कंपनीचे म्हणणे असून आपल्या अधिकृत संकेतस्थळावर याची जाहिरातदेखील सुरु केली आहे. २० वर्षांच्या संशोधननंतर आणि त्यावर लाखो डॉलर्सचा खर्च केल्यानंतर ही कार बनली असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. एकदा फ्यूएल भरल्यावर ही कार ५५० किमी प्रवास करू शकते. जपानमध्ये या कारची किंमत ३५ लाख रूपयांपर्यंत असणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/