मुंबई पुणे महामार्गावर अपघात ; ४ ठार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2019
Total Views |



पुणे : मुंबई - पुणे महामार्गावर अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. शुक्रवारी मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात ४ जण जागीच ठार तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबईकडे सिमेंट घेऊन जाणारा ट्रक विरुद्ध लेनमध्ये घुसला आणि २ चारचाकींवर आदळला.

 

अपघात एवढा भीषण होता की ती चारचाकी १०० फूट दरीत कोसळली. दोन ते तीन क्रेन घटनास्थळी असून त्यांनी चारचाकी वर काढली आहे. तसेच मृतदेहही ताब्यात घेण्यात येत आहेत. वाहतूकीचे नियम न पाळल्याने मुंबई पुणे महामार्गावर अपघाताच्या घटना नेहमी पाहायला मिळतात. या घटनेतही लेन तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न फसल्याचे म्हटले जात आहे.

 

सकाळी दहाच्या सुमारास सिमेंटचा ट्रक पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. लेन क्रॉस करण्याच्या घाईत ट्रक चारचाकीला आदळला आणि चारचाकी मुंबई लेनहून पुण्याच्या लेन वर बोरघाटात पडली. यामधली १ चारचाकी साधारण १०० फूट खाली दरीत पडली. ट्रक रस्त्यात पडला असून त्यातील सिमेंट रस्त्यावर पसरले आहे. त्यामुळे मुंबई पुणे वाहतूक काही काळ ठप्प झाली आहे. वाहतूक कोंडी सुटायला अजूनही तासभर जाण्याची शक्यता आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@