ब्रदरहूड की नेशनहूड?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2019   
Total Views |
 
 
 

नवीन वर्षाच्या सुरुवातीला आसाम सरकारने पाच रोहिंग्या मुसलमानांना म्यानमारच्या सैनिकांकडे सुपूर्द केले. ही बातमी तशी छोटी असली तरी जागतिक पटलावर या बातमीचे काय पडसाद उमटतील किंवा भारतामध्येच घरचे भेदी असलेले आणि रोहिंग्यांच्या समर्थनाचा ठेका घेतलेले तथाकथित विचारवंत राजकारणी काय म्हणतील, याचा विचार करणे आवश्यक आहे.

 

गेलेले वर्ष रोहिंग्या मुसलमान, त्यांचे पलायन आणि त्यांनी म्यानमारच्या शेजारी देशांमध्ये घेतलेला बेकायदेशीर आसरा, त्यातून उडालेली धुमश्चक्री वगैरे वगैरे गोष्टी आणि घटनांनी प्रचंड गाजले. १९६२ मध्ये म्यानमारमध्ये सत्ताकारण तेजीत आले. त्याचवेळी रोहिंग्यांच्या प्रश्नावर वेगळेच निर्णय घेण्यात आले. १९८२ मध्ये एक कायदा पारित करण्यात आला, ज्यानुसार रोहिंग्यांना देशाच्या नागरिकत्वामधून बाहेर काढण्यात आले. इतकेच काय, म्यानमार सरकारने रखाईन प्रांतात प्रत्येक कुटुंबाने फक्त दोन मुलेच जन्माला घालावीत, असा कायदा केला. तसेच आंतरजातीय विवाहांवर निर्बंध लादले. त्यातून पुढे रोहिंग्यांचे प्रश्न निर्माण झाले.

 

तिथेअराकना रोहिंग्या साल्व्हेशन आर्मीनावाच्या संघटनेने दहशतवाद पेरायला सुरुवात केली. ‘इंटरनॅशनल क्रायसिस’ समूहाच्या मते, या हिंसक संघटनेचे नेतृत्व पाकिस्तानात कराचीमध्ये जन्मलेले आणि पुढे मक्का सौदी अरेबियामध्ये निवास असलेल्या अतुल्लाह अबू अम्मिर जुनूनी करत आहे. या संघटनेने म्यानमारच्या उत्तर-पश्चिमी दिशेला आणि बांगलादेशच्या सीमेला लागून असलेल्या रखाईन प्रांतामध्ये अतिरेकी कारवाया सुरू केल्या. रखाईन प्रांतात सैन्य आणि पोलिसी चौक्यांवर हल्ले केले गेले. सातत्याने दहशतवादी कारवायांनी रखाईन प्रांत हादरून गेला. म्यानमार सरकारचे म्हणणे आहे की, रखाईन प्रांतामधले रोहिंग्ये मुसलमान सदर दहशतवादी संघटनेला सहानुभूती देत, म्यानमार सैन्याच्या विरोधात मदत करत असत. सीमेवरील दहशतवाद रोखण्यासाठी म्यानमार सैन्याने कारवाई केली.

 

तर दुसरीकडे रखाईन प्रांतामध्ये असलेल्या हिंदू अल्पसंख्याकांचेही काही प्रश्न आहेत. रखाईन प्रांतामधील हिंदू समुदायाचे नेतृत्व करणारे नेता नी माऊल यांचे म्हणणे आहे की, “रखाईन प्रांत रोहिंग्या मुस्लीमबहुल प्रांत आहे. इथल्या रोहिंग्यांनी हिंदू अल्पसंख्याकांचे शिरकाण केले. अत्याचार केला. आता ते बांगलादेशात पळून गेले आहेत.” नी माऊल पुढे म्हणतात की, “हिंदू अल्पसंख्याकांवर रोहिंग्यांनी केलेल्या अत्याचाराचे अनेक साक्षीदार आहेत. पण, तरीही रखाईन प्रांतामधील अत्याचारपीडित हिंदूंना न्याय मिळाला नाही. लोकांना रोहिंग्या मुसलमानांचा उमाळा येतो, पण त्याच रोहिंग्या मुसलमानांनी इथल्या अल्पसंख्याक हिंदूंवर केलेल्या अत्याचाराबद्दल कुठेच आवाज उठवला जात नाही.”

 

असो, म्यानमारच्या रोहिंग्या मुसलमानाचा प्रश्न आता केवळ म्यानमारचा आहे असे नाही. कारण, आशिया खंडातील इतर देशांत घुसखोरी केलेल्या रोहिंग्यांनी आपली पाळेमुळे त्या त्या देशात रूजवायला सुरुवात केली आहे. भारतातसुद्धा त्यांच्या प्रतिनिधींनी आम आदमी पक्षाचे नेते प्रशांत भूषण यांच्या साहाय्याने सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलीच होती. रोहिंग्या प्रश्नाच्या अभ्यासकांच्या मते, सध्या म्यानमार येथे ६ लाख, बांगलादेश येथे ९ लाख, पाकिस्तानात २.५ लाख, थायलंडमध्ये ५ हजार, मलेशियात १ लाख, सौदी अरेबियात २ लाख आणि भारतात ४० हजार रोहिंग्या मुसलमान वास्तव्यास आहेत.

 

या रोहिंग्यांच्या भारतातील घुसखोरीबाबत भारताच्या केंद्र सरकारने उचित पावले उचलली आहेत. त्यामुळे 3 जानेवारीला आसाम सरकारने रोहिंग्यांना पुन्हा म्यानमारमध्ये धाडणे ही स्वागतार्ह बाब आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील रोहिंग्यांच्या छावणीत काय घडत असेल, हाही मुद्दा पाहण्यासारखा आहे. दिल्लीतील उत्तमनगरमधील रोहिंग्यांच्या छावणीमध्ये येशूच्या पुत्रांनी यशस्वीपणे प्रवेश मिळवला आहे. तिथे धर्मपरिवर्तनाचे चोख काम ते करीत आहेत. इथे प्रश्न उपस्थित की, देशाची सीमा न मानता ‘मुस्लीम ब्रदरहूड’ मानणार्‍या मानसिकतेचे काय झाले? कारण भारत सोडून इतरत्र मुस्लीम देशात काहीही झाले की, आपल्याच घरात ते घडले अशा मानसिकतेचे काही लोक भारतातही आहेत. तर त्यांना हा धडा आहे की, ‘बद्ररहूड’ तर मुख्य असतेच, पण ‘नॅशनहूड’ त्यापेक्षा मोठे, नाहीतर बांगलादेश या मुस्लीम राष्ट्राला रोहिंग्या मुसलमानांनी परत म्यानमारमध्ये जावे, असे वाटले नसते.

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@