अनधिकृत बॅनर प्रकरणी ७ जणांवर गुन्हे दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2019
Total Views |


 


ठाणे - महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम, फेरीवाले, हातगाड्यांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले. या पार्श्वभूमीवर गुरुवारी मुंब्रा प्रभाग समितीअंतर्गत अनधिकृत होर्डिंग, बॅनर लावणाऱ्या ७ जणांविरुद्ध शहर विद्रूपीकरण कायद्यांतर्गत मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

या कारवाईअंतर्गत मुंब्रा स्टेशन परिसर, अमृतनगर, किस्मत कॉलनी व तन्वरनगर इत्यादी परिसरातील ८ बाकडी, २५ ठेले, २२ हातगाड्या, २ उसाच्या रसाच्या गाड्या, ३ पानटपऱ्या व ५ मोटारसायकलवरदेखील कारवाई करण्यात आली. तसेच किस्मत कॉलनी ते तन्वरनगर पर्यंत बांधलेले ६३ शेड तोडण्यात आले. या कारवाईबरोबरच मुंब्रा प्रभाग समितीमधील मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीची मोहीम तीव्र केली जात असून मालमत्ता कर आणि पाणीपट्टी थकबाकीदारांवरदेखील कारवाई करण्यात येत आहे.

 

सदरची कारवाई मुंब्रा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या मागर्दर्शनाखाली सकाळी व दुपारी अशा दोन सत्रात महापलिकेच्या अतिक्रमण विभागाकडील कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली. यापुढेही शहरातील अनधिकृत फेरीवाले, हातगाड्या व बॅनरवर महापलिकेच्यावतीने कठोरपणे कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@