लबाड लांडगं ढ्वाँग करतंय...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2019   
Total Views |

 

 
 
 
 
 
माणसाला शारीरिक गरज, सुरक्षा, प्रेम-स्नेह, समाजसंबंध, बौद्धिक परिपूर्तता आणि त्यानंतर आत्मसिद्धता या गरजा असतात. पण, या सर्व गरजा नाकारून कुणी जर खोट्या कल्पनांचे बुजगावणे उभे करून समाजमनाला अस्थिर करत असेल तर त्यांना काय म्हणावे? भूतकाळातले समाजमन जाळणारे संदर्भ घेऊन समाजाचा वर्तमान उद्ध्वस्त करणाऱ्यांना काय म्हणावे? काही संस्था याच उद्देशाने फोफावल्या आहेत. मग यातलीच काही मंडळी स्वतःला रावण, दुर्योधन वगैरे म्हणविण्यात धन्यता मांडतात. ही मंडळी, संघटना वरून कोणीही असली तरी त्यांचे अंतरंग असते रक्तपिपासू लाल लांडग्याचे. हा लांडगा माणसाच्या जगण्याच्या शाश्वत मूल्याला बगल देऊन २०० वर्षांपूर्वी काय झाले आणि हा पुतळा इथे का? कोण कुणाचा गुरू वगैरेंवर विनाकारण वादंग उठवून समाजात विद्वेषाचा बाजार मांडतो. भय-भूक-भ्रष्टाचारमुक्त समाजासाठी देशाला माता मानणारी सर्व सज्जनशक्ती कर्तव्यमग्न आहे. त्याचवेळी हा लाल लांडगा दहशत माजवून भ्रष्टाचार पोसण्यासाठी समाजामध्ये भय निर्माण करतो. कधी त्याचे हत्यार ‘संविधान बदलणार’ हे असते, तर कधी असते भीमा-कोरेगाव. आता भीमा-कोरेगावचे हत्यार म्यान झाले म्हणून हे बहुरूपी लांडगे पुन्हा एकवटलेत. कशाला म्हणजे? ज्यासाठी खरंच आयुष्यभर काम करावे लागेल, असे समाजाचे सर्व प्रश्न बाजूला सारून सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या बोधचिन्हांमध्ये शनिवारवाड्याचे चित्र का आहे, यासाठी ते नौटंकी करणार आहे. लांडग्याचा उद्देश काय आहे? त्याचा प्रश्न काय आहे? असे विचारल्यावर उघड नाही तर मनात लांडगा नक्कीच म्हणेल,
 

स्वअस्तित्वाच्या प्रेरणेचा, स्वर्ग जरी दिलात

देव म्हणून जरी पुजलात तरी, आम्ही असेच विघातक राहू

प्रश्न इथे सोडवायचेत कुणाला?

आम्हाला तर नसलेल्या प्रश्नांचा, उभा करायचा आहे भस्मासूर

असो, तर लाल लांडग्यांचे मनोगत नक्कीच हेच असेल. हिंसेला चटावलेल्या विघातक वृत्तीच्या लाल लांडग्याचे सोंग आणि ढोंग समाजाने ओळखावे. शाहीर म्हणूनच गेलेत की, ‘लबाड लांडगं ढ्वाँग करतंय.’

 

घूमजाव केल्याने लपत नाही

 

बाळाचे पाय पाळण्यात दिसावेत’ तसे सत्तेत आल्या आल्या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी, कमलनाथ यांनी देशाप्रती आपली नसलेली बांधिलकी दाखविण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, “जे लोक ‘वंदे मातरम’ म्हणत नाहीत ते काय देशभक्त नसतात? त्याचे प्रदर्शन करण्याची गरज काय?” त्यांनी सचिवालयासमोर दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गायले जाणारे ‘वंदे मातरम’ बंद करण्याचे आदेश फर्मावले. त्यानंतर देशभर त्यांच्या आदेशाविरुद्ध वातावरण तयार झाले. बहुसंख्य नागरिक म्हणाले, “वंदे मातरम गायचे नाही तर कन्हैयाकुमार, उमर खलिद या गँगचे ‘भारत तेरे तुकडे होंगे हजार’ गायचे का?” काही म्हणाले, “इटली काँग्रेस आया भारतीय ‘वंदे मातरम’ गया,” काही म्हणाले, ”स्वातंत्र्यपूर्व काँग्रेस सदस्यांनी ‘वंदे मातरम’ म्हणत देशासाठी प्राणत्याग केला. त्याच काँग्रेसचे विकृत रूप म्हणजे आजचे राजकीय काँग्रेस आहे, जे ‘वंदे मातरम’लाच विरोध करते.” एक ना अनेक चर्चा सुरू झाल्या. असो, काँग्रेसच्या हायकमांडना कमलनाथ यांचा ‘वंदे मातरम’संबंधीचा आदेश खटकला नसेल तर नवल नव्हतेच. उलट, कमलनाथ यांच्या आडून सध्याच्या तथाकथित काँग्रेसी विचारवंतांनी, नेत्यांनी खडा टाकून पाहिला की, आजही देशात लोकांमध्ये देशाप्रती, देशाच्या स्वातंत्र्याप्रती जागृती आहे का? जर ‘वंदे मातरम’ला विरोध करूनही जनमत स्वस्थ बसले तर समजायचे की, सुस्त असलेल्या जनतेला कसले आले देशप्रेम, देशनिष्ठा, स्वातंत्र्यलढ्याबद्दल आत्मीयता. त्यामुळे मग या देशाच्या मूळ धर्माशी, स्वतंत्र प्रेरणेशी आपण खेळायला मोकळे. पण, कमलनाथ आणि काँग्रेसचे दुर्देव की तसे झाले नाही. देशप्रेमी जनता खवळून उठली. कमलनाथ यांना आपले मनोरथ पूर्ण करता आले नाही. ‘वंदे मातरम’ गायनबंदीचा आदेश त्यांना मागे तर घ्यावा लागलाच. पण पुन्हा वर अशीही मखलाशी करावी लागली की, ‘वंदे मातरम’ पोलीस बँडच्या साहाय्याने नव्या आकर्षक स्वरूपात गायले जाईल. हे असे म्हणताना कमलनाथ यांच्या चेहर्‍यावर थुंकून चाटण्याचे भाव नसतीलच. पण, चेहरा काहीही बोलला तरी कमलनाथ यांच्या मनात आलेच असेल, “अरेरे! सत्ता मिळवली, पण जनतेमध्ये आपल्या विचारांची सत्ता पेरता येणार नाही. कमलनाथ आणि काँग्रेसने समजायला हवे की, कितीही घूमजाव केले तरीही तुमच्या मनातले लपत नाही.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@