कबड्डी स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jan-2019
Total Views |

 
 
 
 
जळगाव  : 
 
शिवसेना महानगरतर्फे आयोजित कबड्डी स्पर्धेत पुरुषांच्या क्रीडा रसिक संघाने अंतिम सामन्यात महर्षी फाउंडेशनचा 35-25 अशा फरकाने पराभव केला तर महिलांच्या स्पर्धेत स्वामी स्पोर्ट्स संघाने जय मातृभूमी संघाचा पराभव केला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले.
 
 
पारितोषिक वितरण कार्यक्रमाला जिल्हा पेठ पोलीस स्थानकाचे पोनि. सुनील गायकवाड, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नगरसेवक विष्णू भंगाळे, नितीन बरडे, कैलास सोनवणे, ज्योती तायडे, मनोज चौधरी यांच्यासह माजी नगरसेवक श्यामकांत सोनवणे, महानगरप्रमुख शरद तायडे, युवा सेना विस्तारक किशोर भोसले, श्याम कोगटा, प्रतिभा वैखरे, शोभा चौधरी आदी उपस्थित होते.
 
 
यावेळी पो.नि. गायकवाड यांनी विजेत्या संघाला शुभेच्छा देत खेळाडूंनी मेहनत आणि चिकाटी ठेवून सातत्याने कबड्डीत यश मिळवावे, असे सांगितले. मान्यवरांनी पुरुषांच्या स्पर्धेतील विजेता संघ क्रीडा रसिकला रोख 21 हजार आणि चषक तर महिलांच्या विजेता संघ स्वामी स्पोर्ट्सला 11 हजार आणि चषक प्रदान केला.
 
 
स्पर्धा यशस्वितेसाठी उपमहानगरप्रमुख मानसिंग सोनवणे, सुनील राणे, हितेश सोनी, प्रशांत सुरडकर, बन्सी माळी, बाळा वैखरे, निलेश देशमुख, गणेश ठाकुर, राहुल नेतलेकर, सोहम विसपुते, दीपक आर्डे, अजय साळुंखे, माजी नगरसेवक अजय पाटील, प्रमोद कोळी, गोरख केदारे, कैलास सोनवणे, राजेंद्र तायडे, किरण तायडे, विराज भोईटे, शरद पाटील आदींनी परिश्रम घेतले.
@@AUTHORINFO_V1@@