राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपळगाव-सिंदाड गट-गण प्रमुख जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jan-2019
Total Views |

 
 
 
पाचोरा : 
 
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पिंपळगाव-शिंदाड गटप्रमुखपदी संतोष कुटे (पिंपळगाव हरेश्वर) यांची तर पिंपळगाव गण प्रमुखपदी तुषार तुकाराम पाटील (पिंपळगाव हरेश्वर) यांची निवड माजी आ.दिलीप वाघ यांनी जाहीर केली असून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
 
 
तसेच फारूक शेठ खाटीक यांची अल्पसंख्याक आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. पाचोरा येथे ही निवड झाली. यावेळी प्रदेश सदस्य शालिग्राम मालकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख नितीन तावडे, तालुकाध्यक्ष विजय पाटील, हमदेखा पठाण, पिंपळगाव राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत माळी, तुषार काळे, अजय तेली, पप्पू गुजर, गोपी पाटील उपस्थित होते.
 
 
यावेळी बोलताना माजी आ. दिलीप वाघ यांनी नवनियुक्त पदाधिकार्‍यांना शुभेच्छा दिल्या. तसेच आगामी काळ महत्वाचा असून सर्व पदाधिकार्‍यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन करण्यात आले.
@@AUTHORINFO_V1@@