भुसावळ रेल्वेस्थानकात १०० फूट उंचीवर फडकला ‘तिरंगा’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jan-2019
Total Views |


 
 
भुसावळ :
रेल्वेस्थानकाच्या दक्षिणेकडील मुख्य प्रवेशद्वारासमोर २५ रोजी १०० फूट उंचीवर सुमारे २० किलो वजनाचा तिरंगा खा. रक्षाताई खडसे यांच्या हस्ते रिमोटचे बटण दाबून शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता फडकाविण्यात आला.
 
यावेळी रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी राष्ट्रगीत सादर केले. या कार्यक्रमास आ. संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, डीआरएम आर.के यादव, अप्पर मंडल रेल प्रबंधक मनोज सिन्हा, वरिष्ठ मंडल अभियंता राजेश चिखले, वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा, वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्य अजय दुबे, वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा, वरिष्ठ मंडल यांत्रिक अभियंता पी. रामचद्रंन, वरिष्ठ मंडल विद्युत अभियंता जी. के. लखेरा, मंडल इंजिनिअरिंग अभियंता एम.बी.तोमर, स्टेशन अधीक्षक जी.आर.अय्यर, स्टेशन मॅनेजर मनोज श्रीवास्तव, सीनियर सेक्शन इंजिनियर राजेंद्र देशपांडे, सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@