चंदा कोचर, वेणुगोपाल धूत यांची सीबीआय चौकशी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jan-2019
Total Views |


 

नवी दिल्ली : आयसीआयसीआय बँकेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांनी बेकायदा कर्जवाटप प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) एफआयआर दाखल केला आहे. सीबीआयने मुंबईतील चार ठिकाणांवर छापे टाकले आहेत. सीबीआयने वेणूगोपाल धूत यांच्या व्हिडिओकॉन समुह व दीपक कोचर संस्थापक असलेल्या रिन्युएबलविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

कर्ज घोटाळ्यात अडकलेल्या चंदा कोचर यांनी आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा राजीनामा दिला होता. आयसीआयसीआय बँकेने त्यांच्या जागी संदीप बक्शी यांची नियुक्ती केली असून त्यांचा कार्यकाळ ५ वर्षांचा आहे. सध्या व्हिडिओकॉन कर्ज घोटाळाप्रकरणी कोचर यांच्याविरोधात तपास सुरू आहे. मात्र, या तपासावर याचा काहीही परिणाम होणार नाही, असे बँकेने म्हटले आहे.

 

व्हिडिओकॉन कर्ज घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) यापूर्वी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर, दीर राजीव कोचर आणि व्हिडिओकॉन समुहाचे वेणुगोपाल धूत यांची चौकशी केलेली आहे. आयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉनला ३ हजार २५० कोटींचे कर्ज दिले होते. मात्र, यातील २ हजार ८१० कोटी रुपयांची परतफेड झाली नाही आणि ते एनपीए (नॉन परफॉर्मिंग अॅसेट) म्हणून घोषित करण्यात आल्याचा आरोप आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@