‘ऐसा योग आता’...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jan-2019   
Total Views |



एकीकडेप्रवासी भारतीय दिवस’ अर्थात ‘ओव्हरसीज इंडियन्स डेसाजरा केला जात असताना आणि प्रवासी भारतीय हे देशाच्या क्षमतेचे प्रतीक आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असताना, दुसरीकडे जागतिक संस्थांनी जागतिक अर्थव्यवस्थेचे मूल्यमापन करणे आणि त्या आधारावर भारत ही गुंतवणूकदारांना आकर्षित करणारी जगातील चौथी बाजारपेठ बनत असून यामध्ये भारताने ब्रिटनसह अनेक बड्या देशांना मागे टाकले असल्याचे जाहीर करणे, हा एक अत्यंत सकारात्मक योगायोग म्हणावा लागेल. याचे कारण म्हणजे, या दोन्ही गोष्टी एकविसाव्या शतकातील नव्या, आधुनिक जगात भारत समर्थपणे व संयतपणे वाटचाल करत असल्याचे प्रतीक आहेत.

 

‘मानवाचे अंती, एक गोत्र’ या कवितेत कवी विंदा करंदीकरांनी ज्याप्रमाणे मानवी जगताचे विशाल दृष्टिकोनातून चिंतन केले आहे, त्या चिंतनाला समांतर जाणारी आपली हिंदू मूल्ये आहेत, जी ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना मांडतात. आधुनिक जगाच्या संदर्भात विचार करत असताना जुनाट, निरूपयोगी गोष्टींना तिलांजली देत नव्या जगाच्या स्पर्धेत उतरून, स्वत्वाची ताकद जपत दुसरीकडे ‘वसुधैव कुटुंबकम्’ हे मूल्यही जपणे, ही खरेतर तारेवरची कसरत. जागतिक राजकारणात समन्वयाची भूमिका बजावणे आणि ‘जगतगुरू’ बनण्याची आकांक्षा भारतीय समाजमन बाळगते. या प्रक्रियेत उतरत असताना प्रवासी भारतीय आणि जागतिक बाजारपेठ हे योग, आयुर्वेद यांच्या सोबतीनेच अत्यंत महत्त्वाचे घटक ठरतात. आज भारतीय वंशाच्या व जगात विविध देशांत स्थायिक झालेल्या नागरिकांच्या कर्तृत्वाचा डंका जगभरात वाजतो आहे. आयटी क्षेत्रातील अभियंते, गणिततज्ज्ञ, अवकाश संशोधक इथपासून ते आता उद्योजक आणि राजकारणी म्हणूनही जगभरात भारतीय वंशाचे नागरिक आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत. एकेकाळी विदेशात जाणे हे त्याज्य ठरविण्याची घातक आणि निर्बुद्ध समजूत विनाकारण घालून घेतलेल्या या समाजाने कालौघात स्वतःला बदलले, या अशा समजुतींना तिलांजली दिली आणि त्याचा परिणाम, या देशवासीयांचे कर्तृत्व जगासमोर लख्खपणे झळकले.

 

अनिवासी भारतीय हे देशाच्या क्षमतांचे प्रतीक असून ते देशाचे ‘ब्रँड अ‍ॅम्बेसिडर’ आहेत, हे पंतप्रधान मोदींचे उद्गार म्हणजे या कर्तृत्वाला एक प्रकारची सलामीच म्हणावी लागेल. या कौतुकोद्गारांना साजेसे कामही या पाच वर्षांच्या कार्यकाळात मोदी सरकारने करून दाखवले आहे. उदाहरणार्थ, पासपोर्ट कार्यालयातील पूर्वीचा आणि आताचा अनुभव, त्या सर्वच प्रक्रियेत आलेली कमालीची सुलभता आणि गती यातून हे सिद्ध झाले आहे. याशिवाय आता पासपोर्टच्या प्रक्रियेत आणखी काही मोठे बदल करायचे सरकारने ठरवले आहे, हेही स्वागतार्हच. नोकरी-व्यवसायानिमित्त विदेशात स्थायिक होणे हे जणू पापच आणि देशद्रोहच, अशी समजूत आजही अनेकांमध्ये आढळते. अशात दुसर्‍या बाजूला अनिवासी भारतीय या विषयात एवढे उत्तम काम होणे निश्चितच स्वागतार्ह आहे. एकीकडे भारतीय नागरिक देशाबाहेर जाऊन देशाची मान अभिमानाने उंचावत असताना आणि सरकारकडून त्यांना खतपाणी मिळत असताना, दुसरीकडे भारतीय अर्थव्यवस्था जागतिक स्पर्धेत उतरून एकेकाळच्या बलाढ्य अर्थव्यवस्थांनाही आज मागे टाकतो आहे, ही आणखी एक आनंदास्पद बाब. अनेक जागतिक संस्थांचे गेल्या काही दिवसांतील वा महिन्यांतील अहवाल काढून पाहिले तर भारतीय अर्थव्यवस्थेची घोडदौड जाणवून येते.

 

आज जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट घोंघावत असताना भारत मात्र जागतिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरत आहे. दुसरीकडे, चीनसारखा देश मात्र यात बराच मागे पडल्याचे दिसत आहे. अर्थात, चीनचे पहिल्या तीनमधील स्थान कायम असले तरी ब्रिटन, फ्रान्ससारखे विकसित देश या स्पर्धेत मागे पडत आहेत. मुक्त अर्थव्यवस्थेत, जगाच्या स्पर्धेत उतरून स्वतःला सिद्ध करण्याची तीव्र आकांक्षा भारतीय अर्थव्यवस्थेत दिसून येत असून जुन्या समाजवादी संकल्पनांना आपण फाटा दिला आहे, हे आपल्या भारतीय मूल्यांतील भारताकडे नेहमीच एक ‘सॉफ्ट पॉवर’ म्हणून पाहिले जाते. आज जगात योग, आयुर्वेदासह भारतीय जीवनमूल्ये, तत्त्वज्ञान यांचा प्रचार-प्रसार वाढतो आहे. अशात, अनिवासी भारतीय आणि भारतीय अर्थव्यवस्था हेदेखील ताकदीने वाटचाल करत आहेत. त्यामुळे येता काळ हा भारताचा असावा, या लाखो-करोडो भारतीयांच्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी एकेक पाऊल संयतपणे मात्र दृढतेने पुढे पडते आहे, असे मानायला हरकत नसावी.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@