रेल्वे नोकरभरतीतही १० टक्के आरक्षण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jan-2019
Total Views |



नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या विविध विभागांच्या चार लाख रिक्तपदांसाठी भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी याची घोषणा केली आहे. पुढील दोन वर्षां सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जागा आणि इतर जागांसाठी एकूण चार लाख कर्मचाऱ्यांची भरती होणार असल्याचे त्यांनी सांगितले. लाख ३० हजार नवीन जागांच्या भरतीमध्ये आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या उमेदवारांना १० टक्के आरक्षण दिले जाणार आहे.

 

ते म्हणाले, “गेल्या वर्षात आम्ही दीड लाख पदांची भरती केली आहे. आणणी दोन लाख ३० हजार कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. सध्यस्थितीला रेल्वेच्या १ लाख ३२ हजार जागा रिक्त आहेत. दोन वर्षांमध्ये आणखी एक लाख कर्मचारी निवृत्त होणार असल्याने जुन्या सी आणि डी श्रेणीतील जागांसह नव्याने तयार होणाऱ्या जागा मिळून एकूण ४ लाख कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे.

 

रेल्वे भरती दोन टप्प्यांमध्ये केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात लाख ३१ हजार ४२८ पदांसाठी फेब्रुवारी अथवा मार्च महिन्यात जाहिरात काढली जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात ९९ हजार पदांसाठी मे-जून महिन्यात जाहिरात निघेल. दरम्यान, लाख ३० हजार नवीन जागांच्या भरतीमध्ये आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या उमेदवारांना १० टक्के आरक्षण दिले जाणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@