ठाण्यात रंगणार 'महाराष्ट्र सेलिब्रिटी क्रिकेट लिग'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jan-2019
Total Views |



ठाणे - मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक सितारे १, २ आणि ३ फेब्रुवारी रोजी ठाण्यात क्रिकेट खेळताना दिसणार आहेत. निमित्त आहे ‘महाराष्ट्र सेलेब्रिटी क्रिकेट लिग’ या स्पर्धेचे. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने नूतनीकरण करण्यात आलेल्या दादोजी कोंडदेव स्टेडियमचे उद्घाटन या स्पर्धेने होणार असल्याची माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच या प्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात स्पर्धेच्या ट्रॉफी आणि थीमसॉंगचे अनावरण करण्यात आले.

 

‘महाराष्ट्र सेलेब्रिटी क्रिकेट लिग’ या स्पर्धेचे यंदा पहिलेच वर्ष आहे. स्पर्धेचे आयोजन ठाणे महापालिका आणि दिग्दर्शक विजू माने, आकाश पेंढारकर, संदीप जुवाटकर यांनी केले असून डी. बी. एन्टरटेन्मेंटचे दिलीप भगत सहआयोजक आहेत. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे, ठाणे मनपा शिक्षण मंडळ सभापती विकास रेपाळे यांच्यासह स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या सहा संघाचे कर्णधार अनुक्रमे ‘मुंबईचे मावळे’ - संजय जाधव, ‘बाणेदार ठाणे’ अंकुश चौधरी, ‘कोकणचे वाघ’ - सिद्धार्थ जाधव, ‘खतरनाक मुळशी’ महेश लिमये, ‘पराक्रमी पुणे’ - सौरभ गोखले आणि ‘लढवय्ये मीडिया’ विनोद सातव उपस्थित होते.

 

या स्पर्धेत उपेंद्र लिमये, राजेश शृंगारपुरे, संजय नार्वेकर, विनय येडेकर, अतुल परचुरे, हृषीकेश जोशी, प्रथमेश परब, अनिकेत विश्वासराव, प्रविण तरडे, शरद केळकर, समिर धर्माधिकारी, अंगद म्हसकर, माधव देवचक्के, निरंजन नामजोशी, सुनील अभ्यंकर, विजय आंदळकर, अमित भंडारी, सोनी मराठीचे अमित फाळके ,झी स्टुडीओजचे मंगेश कुलकर्णी, संगीत मराठीचे दीपक देऊळकर,झी टॉकीजचे बवेश जानवलेकर, एबीपी माझाचे विनोद घाटगे, टीव्ही ९चे कपिल देशपांडे, न्यूज १८ लोकमतचे विराज मुळ्ये यांच्यासह अनेक सेलेब्रिटींचा सहभाग असणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@