
नवी दिल्ली : नुकतिच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बॉलीवुड कलाकारांची भेट घेतली होती. या दरम्यान तिथेच उपस्थित असलेले कार्तिक आर्यन, करण जोहर आणि इम्तियाज अली यांची मोदींशी भेट झाली नव्हती. या तिघांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी एका फ्रेममध्ये पाठमोरे उभे असताना एक फोटो (बॅक्फी) क्लिक केला.
Losers’ backfie with the
— Kartik Aaryan (@TheAaryanKartik) January 19, 2019
Honorable PM! 🙈#ImtiazAli @karanjohar #Dineshvijjan pic.twitter.com/Cl9yYSf2Hc
कार्तिक आर्यनने हा फोटो ट्विट करत ‘लुझर्स बॅक्फी विद पीएम नरेंद्र मोदी’, असे कॅप्शन दिली. मात्र, पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी हा फोटो रिट्विट करत ‘लुझर्स नव्हे तर रॉकस्टार’ असे, म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॉलीवुड कलाकारांशी नुकतिच भेट घेतली होती. त्यावेळी करण जोहर, इम्तियाज अली आणि कार्तिक आर्यन यांची भेट मोदींशी होऊ शकली नाही.
Not losers but Rockstars!
— Narendra Modi (@narendramodi) January 20, 2019
No selfie Jab We Met but there will always be another occasion. :) https://t.co/1Ud7D5jIvd
एका फोटोमध्ये त्यांनी एक फोटो घेत ‘बॅक्फी’, असे नाव दिले. ही पोस्ट व्हायरल झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कार्तिक आर्यनचे हे ट्विट रिट्विट करत ‘नॉट लुझर्स बट रॉकस्टार’, असे म्हटले. जेव्हा असा प्रसंग पुन्हा येईल, त्यावेळी नक्की भेटू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
Epic 🙏🏻😂 https://t.co/2UrdAJBq8K
— Kartik Aaryan (@TheAaryanKartik) January 21, 2019
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/