प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jan-2019
Total Views |



पुणे : "खेलो इंडियाच्या माध्यमातून देशभरातील क्रीडा क्षेत्रातील हिरे आपल्याला गवसले आहेत. क्रीडा क्षेत्रात देशाला अग्रेसर बनविण्यासाठी शालेय अभ्यासक्रमाबरोबरच खेळाला स्थान देणे आवश्यक आहे. सशक्त भारताच्या निर्माणासाठी आता यापुढे प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे." अशी घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी केली.

 

महाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात खेलो इंडियाच्या पुरस्कार वितरणप्रसंगी श्री. जावडेकर बोलत होते. यावेळी क्रीडा मंत्री विनोद तावडे, केंद्रीय क्रीडा सचिव राहुल भटनागर, स्पोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाच्या (साई) महासंचालक नीलम कपूर, अतिरिक्त मुख्य सचिव (क्रीडा) वंदना कृष्णा, स्पोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाच्या (साई) उपमहासंचालक संदीप प्रधान, क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, ऑलिम्पिक ऑफ इंडियाचे प्रतिनिधी तथा सह सचिव ओंकार सिंग, स्टार स्पोर्टचे चैतन्य दिवाण आदी उपस्थित होते.

 

येत्या निवडणुका 'मजबूत सरकार'विरुद्ध 'मजबूर सरकार' मुद्द्यावरच

 

आगामी लोकसभा निवडणूक 'मजबूत सरकार'विरुद्ध 'मजबूर सरकार' या मुद्द्यावरच लढवल्या जातील, असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले. "गेल्या ५६ वर्षांत काँग्रेसने गरिबांचा विचार केला नाही आणि आम्हाला ५६ दिवसांचा हिशोब विचारत आहेत. ९० दिवसांनी पुण्यात मतदान होईल, तर देशात काही ठिकाणी मतदान सुरू असेल. यातून जनता कुणासोबत आहे हे स्पष्ट होईल." असेही ते पुढे म्हणाले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@