
मुंबई - आशिया खंडातील सर्वात लोकप्रिय असलेल्या मुंबई मॅरेथॉन मुख्य स्पर्धेत पुरूष गटात केनियाचा धावपटू कॉसमॉस लॅगट याने मिळवले तर महिला गटात इथिओपियाची वरकमेश अलेमु विजेती ठरली आहे. तर भारतीयामध्ये नरेंद्रसिंह रावत प्रथम तर महिलामध्ये सुधा सिंह प्रथम आली आहे.
मुंबई मॅरेथॉन स्पर्धेला पहाटे ५.३०ला सुरुवात झाली. भारतीय बॉक्सर मेरी कॉमच्या हस्ते फ्लॅग ऑफ करण्यात आले. या मॅरेथानला राज्याचे राज्यपाल के. सी. विद्यासागर, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, बॉलीवुडचा दिग्दर्शक सोहेल खान आदींची उपस्थिती आहे. प्रत्येक वर्षी जानेवारीच्या तिसऱ्या रविवारी या मॅरेथॉनचे आयोजन मुंबईत केले जाते. या मॅरेथॉन स्पर्धेत एलिट गटामध्ये इथियोपिया आणि केनिया या देशांच्या धावपटूंचा दबदबा पाहायला मिळतो. या मॅरेथॉनमध्ये स्पर्धेत ४ लाख ५ हजार यूएस डॉलर किमतीची बक्षिसे दिली जाणार आहेत.
मुंबई मॅरेथॉन ही जगातील अव्वल १० मॅरेथॉनपैकी एक मानली जाते. आशिया खंडातील सर्वात मोठी मॅरेथॉन स्पर्धा आहे. विविध प्रकाराच्या मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात येतात. यात पूर्ण मॅरेथॉन, ड्रीम रन, हाफ मॅरेथॉन, सिनिअर सिटिझन रन, दिव्यांगांची मॅरेथॉन आणि १०के रन अशा वेगवेगळ्या स्पर्धांचा समावेश असतो. यावेळी स्पर्धेसाठी एकूण ४६,४१४ धावपटूंनी नोंदणी केली असून यातील ८,४१४ मुख्य मॅरेथॉन तर १५ हजार ४५७ धावपटू अर्धमॅरेथॉनमध्ये सहभागी होते.
मॅरेथॉनमध्ये 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'चा संदेश
मुंबई मॅरेथॉनमध्ये 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'चा संदेश देण्यात आला. सहभागी स्पर्धकांनी हातात फलक घेऊन विविध घोषणांद्वारे या अभियानाबाबत जनजागृती केली. मॅरेथॉनमध्ये मुलगा - मुलगी एकसमान, मुलगीसुद्धा ठरु शकते कुटुंबाची सक्षम वारसदार, मुलगी शिकली तर कुटुंब शिकेल आदी संदेश देण्यात आले. तसेच कुपोषण रोखण्यासाठी मुलींच्या पोषणाबाबत जनजागृती करण्यात आली. मॅरेथॉनमध्ये स्पर्धकांनी हाती घेतलेले 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'चे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. या मोहीमेत एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त इंद्रा मालो, महिला - बालविकास विभागाचे सहसचिव लालसिंग गुजर, कक्ष अधिकारी रमेश सरफरे, सीमा डोके, कुलाबा बालविकास प्रकल्प अधिकारी अर्चना तोमर आदी सहभागी झाले होते.
मुख्य मॅरेथॉन विजेते
पुरुष गट
प्रथम : कॉसमॉस लॅगट, केनिया
द्वितीय : आयच्ह्यू बनटाई, इथिओपिया
तृतीय : शुमित अकलन्यू, इथिओपिया
महिला गट
प्रथम : वरकमेश अलेमु इथिओपिया
द्वितीय : अमाने गोबेना इथिओपिया
तृतीय : ब्राईक डिबेला इथिओपिया
भारतीय पुरुष विजेते
प्रथम : नरेंद्रसिंह रावत
द्वितीय : गोपी टी
तृतीय : करण सिंह
भारतीय महिला गट
प्रथम : शेरनू मुगता
द्वितीय : करण थापा
तृतीय : कालीदास हिरवे
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/