हिंम्मत असेल तर पवार आणि चव्हाणांनी वेगवेगळे लढा : चंद्रकांतदादा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2019
Total Views |


सांगली : भाजपविरोधात सर्व पक्षांना आघाडी करावी लागत आहे यातच भाजपचा विजय आहे, असा टोला महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विरोधीपक्षांना लगावला आहे. यावेळी शरद पवार आणि अशोक चव्हाण यांनी निवडणूकीत वेगवेगळे लढून दाखवा असे आव्हान चंद्रकांतदादांनी कॉंग्रेस राष्ट्रवादीला दिले आहे.

 

उत्तर प्रदेशमध्ये मायावती आणि अखिलेश यादव यांच्यातून विस्तव जात नव्हता, पण आता नरेंद्र मोदींना घाबरुन ते एकत्र येतात, असा टोलाही त्यांनी लगावला. सांगलीत भाजपच्या कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. गेल्या निवडणुकीत वेगवेगळ्या लढलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीला आता आपण जर वेगवेगळे लढलो तर हातचे सर्व जाणार अशीच भीती सर्व भाजपविरोधकांना आहे.

 

पाटील म्हणाले तीन राज्यांमध्ये आमचा पराभव झाला असे बोलले जात आहे, मात्र, पूर्ण राज्यात काँग्रेसपेक्षा १ लाख ५० हजार जास्त मते भाजपला मिळाली आहेत. पाचच आमदारांचा फरक पडला त्यातील दोन आमदार हे एक एकेका मताने गेले आहेत. एकूण अकरा आमदार दहापेक्षा कमी मतांनी गेले याला काय पराभव म्हणायचा का असा सवाल करत लोकशाही पद्धती आम्ही स्वीकारली आहे, असे पाटील म्हणाले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@