ठाण्यात जिल्ह्यात १००० तळीरामांवर कारवाई

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2019
Total Views |



ठाणे - थर्टी फर्स्टला मद्यपान करुन वाहन चालविणाऱ्या तळीरामांना पोलिसांनी ड्रिंक अँड ड्राईव्हचा झटका दिला आहे. कल्याण, भिवंडी, उल्हासनगर पोलीस परिमंडळाने रात्रभर विविध शहरातील चौकात नाक्यावर नाकाबंदी करुन दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या तब्बल १ हजार तळीरामांना फौजदारी कारवाईचा बडगा उगारला. यामुळे जिल्ह्यात नाकाबंदी, पेट्रोलिंगच्या माध्यमातून अनुचित प्रकारांना रोखण्यास पोलीस यंत्रणाला यश आले आहे.

 

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव वर्षाचे स्वागत करण्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी तरुणाई एकवटली असल्याचे चित्र पाहायला मिळाले. थर्टी फर्स्टच्या पार्टीनंतर दारूच्या नशेची झिंग चढल्यामुळे काही तळीरामांनी वाऱ्याच्या वेगाने गाड्या चालवणे, वादावाद करणे, असे काही अनुचित प्रकार केले. यासर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलिसांनी ठाण्यात विविध ठिकाणी नाकाबंदी केली आणि दारू पिणाऱया वाहन चालकांवर कारवाई केली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@