पी.व्ही सिंधुने म्हटले की "जेव्हा मी बाहेरच्या देशात खेळायला जाते. तेव्हा मी पाहते की महिलांविषयी तेथील लोकांना अत्यंत आदर आहे. मला आनंद आहे की दुसऱ्या देशांमध्ये महिलांचा आदर केला जातो. भारतात लोक म्हणतात की महिलांचा आदर करायला हवा. परंतु फार कमी लोक ही गोष्ट आपल्या कृतीत उतरवतात." पी.व्ही सिंधु एवढेच बोलून थांबली नाही तर तिने महिलांनाही #Metoo विषयी मेलाचा सल्ला दिला. "महिलांनी सक्षम व्हायला हवे आणि स्वत:वर विश्वास ठेवायला हवा. महिलांनी समोर येऊन लैंगिक शोषणाविषयी बोलायला हवे. यामध्ये लज्जास्पद अशी कोणतीही गोष्ट नाही. आपल्याला गर्व वाटायला हवा की आपण सक्षम आहोत आणि पुढे जात आहोत."
#Metoo या मोहिमेमुळे लोकांच्या मानसिकतेमध्ये खूप बदल झाला आहे. असेही पी.व्ही सिंधुने म्हटले. हैदराबाद पोलीसांनी महिलांच्या लैंगिक शोषणाविरोधात महिलांनी पुढाकार घेऊन तक्रार करावी. यासाठी SH(OUT) हा उपक्रम राबवला आहे. SH(OUT) या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात पी.व्ही. सिंधु बोलत होती. हा उपक्रम राबविण्यासाठी पी.व्ही. सिंधुने हैदराबाद पोलीसांचे कौतुक केले.
कामाच्या ठिकाणी महिलांचे होणारे लैंगिक शोषण रोखण्यासाठी त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी हैदराबाद पोलीसांनी एक विशेष समिती स्थापन केली आहे. कॉर्पोरेट कंपन्या,तेलुगु सिनेसृष्टी,विद्यापीठ, शैक्षणिक संस्था, रुग्णालय यांमधील एक प्रतिनिधी या समितीमध्ये नेमण्यात आला आहे. या ठिकाणी महिलांचे होणारे लैंगिक शोषण रोखण्यासाठी हैदराबाद पोलीसांनी हे सकारात्मक पाऊल उचलले आहे. अशी माहिती शिखा गोयल (अतिरिक्त आयुक्त, गुन्हे आणि एसआयटी, SHE-टीम इन्चार्ज, हैदरबाद) यांनी दिली.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/