दिलेली आश्वासने पुर्ण करत असल्याचे भासवण्याचा सत्ताधार्‍यांचा प्रयत्न - अजित पवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jan-2019
Total Views |

जळगाव : 
 
लवकरच आचारसंहिता लागणार आहे. पाच राज्यात झालेला पराभव पाहून सत्ताधार्‍यांनी दिलेली आश्वासने पुर्ण केली जात आहेत असे भासवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार यांनी राष्ट्वादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत केले.यावेळी विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते ना. धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आ. छगन भुजबळ, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, महिला राष्ट्ीय अध्यक्षा फौजिया खान, प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आदी पदाधिकारी उपस्थित होते.
 
यावेळी अजित पवार यांनी संबोधित करतांना राज्यावर दुष्काळाचे सावट आहे. पण सरकार उपाय योजना करण्या ऐवजी दुर्लक्ष करत आहे. दोन दिवसांपुर्वी डांसबार बंदी न्यायालयाने उठविली. सरकार न्यायालयात भक्कम बाजू मांडण्यात कमी पडले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश न्यायालयाने दिले तेथे सुध्दा सरकार बाजु मांडण्यास कमी पडले. मराठा आरक्षण न्यायालयात टिकले पाहिजे यासाठी सरकारने चांगले वकिल नेमून भक्कम बाजू मांडली पाहिजे परंतु सरकार याबाबत गंभिर नसल्याचे दिसून येते.
 
जळगाव जिल्ह्यातील लोकसभेच्या जागांच्या तिढ्याबद्दल माहिती देतांना सर्वोच्च पातळीवर नेते ठरवतात त्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी खालच्या पातळीवर करण्यात येते. राष्ट्वादी काँग्रेसकडे चांगले उमेदवार आहेत. अ‍ॅड. निकम यांनी उमेदवारीसाठी होकार किंवा नकार सुध्दा दिलेला नाही. डांसबार बंदीचा निर्णय आम्ही घेतला होता. हे सरकार कातडी बचाव करत आहे. डांसबार बंदी न्यायालयात टिकण्यासाठी चांगले प्रयत्न करायला पाहिजे होते.
धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होवू नये यासाठी प्रयत्न सुरु आहेत. राज्यातील 48 पेैकी 44 जागांबाबत चर्चा झाली आहे. राहिलेल्या 4 जागांवर मार्ग निघेल. जागांचे वाटप जाहिर केले जात नाही तो पर्यंत उमेदवार घोषीत केले जाणार नाही. रावेरच्या जागेसाठी खडसेंची वाट पाहत आहेत का , प्रश्नाला पवार यांनी उत्तर देतांना रणधुमाळी जवळ येते तसतसे अफवांचे पेव फुटत असते. रावेरच्या जागेसाठी खडसेंची वाट पाहत आहे याला आधार नाही. उमेदवारांची चाचपणी केली आहे. लोकांचे मत काय आहे हे आजमावत आहोत. राज्य सरकारमधील 22 मंत्र्यांवर भ्रष्ट्ाचाराचे आरोप आहेत. पण मुख्यमंत्री क्लिनचिट देतात , त्यामुळे गिरिष बापट यांचा राजिनामा मागुन सुध्दा ते देणार नाहीत.
 
 
बोंडअळीच्या नुकसानभरपाईबाबत दोन्ही सभागृहात आम्ही आवाज उठविला आहे. सत्ताधार्‍यांना सत्तेचा माज आला आहे. या जिल्ह्यात आठ दिवसांपासून शेतकरी उपोषणास बसले आहेत. निवडणुका आल्या की गाजर दाखविले जाते असे सांगितले.
 
धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होवू नये यासाठी प्रयत्न
 
धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होवू नये यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्याच अनुषंगाने अ‍ॅड.प्रकाश आंबेडकरांशी आम्ही बोलत आहोत.
तु मारल्या सारखे कर मी रडल्या सारखे करतो
 
भाजपा - सेनेच्या युतीबाबत पवार यांनी माहिती देतांना तु मारल्या सारखे कर , मी रडल्या सारखे करतो अशी युतीची स्थिती आहे.एकखाद्या मुद्यावर शेवटच्या क्षणी ते एकत्र येतील.
 
खडसेंचा स्वाभिमान जागृत व्हावा
 
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आ. एकनाथराव खडसे हे स्वाभिमानी आहेत. त्यांच्यावर अन्याय झाला असेल तर त्यांनी त्यांचा स्वाभिमान दाखवावा अशी माहिती दिली.
 
या प्रसंगी फौजीया खान यांनी डांसबार बंदी उठवली गेल्याने राज्याचे मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांना कुरीअरने घुंगरु पाठवत असल्याचे घोषीत केले.
@@AUTHORINFO_V1@@