मुंबई आयआयटीमध्ये सुरेश प्रभू करणार मार्गदर्शन

    18-Jan-2019
Total Views |
 

मुंबई : दर वर्षी जानेवारीत होणारे आन्ट्रप्रोनरशिप-समिट (इ-समिट) हा आयआयटी मुंबईच्या इ-सेलचा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. १९ आणि २० जानेवारी रोजी संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. याशिवाय प्रसिद्ध व्यावसायिक निरंजन हिरानंदानी, कॉमेडियन बिस्व कल्याण राठ आणि केनी सेबास्टियन आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

 

या समिटकरिता दकॉलेजफीवर (टीसीएफ) या बंगळुरूतील स्टार्टअपची टिकेटिंग पार्टनर म्हणून निवड करण्यात आली आहे. आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये उद्योजकतेच्या संस्कृतीस प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरू झालेले हे इ-समिट होतकरूंसाठी उपयुक्त ठरते. या समितीसाछी ३० हजारांहून जास्त विद्यार्थ्यांची उपस्थिती असणार आहे.

 

टीसीएफ हे कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी आणि इव्हेंट आयोजकांसाठी वन-स्टॉप-शॉप असून तो केवळ तिकीट विक्रीचा मंच नसून ऑनलाइन तिकीट विक्रीत मदत करण्याव्यतिरिक्त टीसीएफने महाराष्ट्रातील या कॉलेज फेस्ट्ससाठी व्यापक डिजिटल प्रमोशन करून नव्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास आणि नोंदणी वाढवण्यास मदत केली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/