नवी दिल्ली : केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाच्या वतीने येथे ‘हुनरहाट’ या हस्तकला व खाद्य पदार्थांचे प्रदर्शन व विक्री सुरु आहे. या प्रदर्शनामध्ये झणझणीत मिसळपाव, ब्रोकेड पैठणींसह मुनिया पैठणी हे महाराष्ट्राचे स्टॉल्स प्रमुख आकर्षण ठरत आहेत. कॅनॉट प्लेस येथील बाबा खडक सिंह मार्गवरील स्टेट एम्पोरिया कॉप्लेक्समध्ये हे प्रदर्शन चालू आहे. या ठिकाणी विविध राज्यांतील हस्तकलांचे व खाद्यपदार्थांचे ७५ स्टॉल्स लावण्यात आले आहेत.
महाराष्ट्रातील औरंगाबादचे साकेब नैय्यर गिराम यांचा स्टॉल क्र. सी-५८ हा पैठणीचा स्टॉल व स्टॉल क्र. एफ-७ हा खास महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांचा स्टॉल ग्राहकांचे खास आकर्षण ठरत आहेत. साकेब नैय्यर गिराम यांच्या मोर , पोपट आणि कमळ यांच्या काठाची खास विण असलेली मुनिया पैठणी आणि हाताने विणलेल्या ब्रोकेड पैठणीच्या स्टॉलला खास प्रतिसाद मिळत आहे. याठिकाणी जवळपास १० ते ६० हजारांपर्यंतच्या पैठणी विक्रीस आहेत. तर स्टॉल क्र. एफ-७ वर मिसळपाव, वडापाव, पाव भाजी आणि समोसा पाव दिल्लीकर खवय्यांना भुरळ घालत आहेत.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/