पत्रकार हत्या प्रकरण : राम रहिमला जन्मठेप

    17-Jan-2019
Total Views |


नवी दिल्ली : पत्रकार छत्रपती हत्या प्रकरणी डेरा सच्चा सौदाच्या गुरमीत राम रहिमला सीबीआय विशेष न्यायालयाने गुरुवारी जन्मठेप सुनावली. यापूर्वी ११ जानेवारी रोजी झालेल्या सुनावणी राम रहिमसह अन्य तीन जणांना दोषी ठरवले होते. गुरुवारी या प्रकरणी सुनावणी होणार या कारणामुळे पंचकूला, रोहतक आणि सिरसा येथे तणाव दिसून येत होते. दरम्यान या ठिकाणच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

 

गुरुवारी झालेल्या सुनावणीत सीबीआयच्या विशेष न्यायालयाने हा निर्णय घेतला. छत्रपती हे 'पूरा सच' या नावाचे वृत्तपत्र चालवत. २००२ मध्ये त्यांना एक पत्र आले होते. राम रहिम हा त्याच्या डेऱ्यामधील महिलांचे यौन शोषण करतो, असे त्या पत्रात म्हटले होते.

 

त्यावरुन छत्रपती यांनी त्यांच्या वर्तमानपत्रामध्ये ते पत्र जशेच्या तसे छापले. यानंतर १९ ऑक्टोबरला त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. यात २१ ऑक्टोंबरला दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. न्यायालयाने राम रहिम आणि किशन लाल यांना दोषी जाहीर करत कुलदीप आणि निर्मल यांच्याविरोधात आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा सिद्ध केला होता.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/