‘आयुषमान भारत’साठी बिल गेट्स यांनी केले मोदी सरकारचे कौतुक

    17-Jan-2019
Total Views |
 
 

नवी दिल्ली : जागतिक पातळीवर दिग्गज तंत्रज्ञान कंपनी मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि गेस्ट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष बिल गेट्स यांनी मोदी सरकारच्या महत्वकांशी योजना असलेल्या आयुषमान भारतचे कौतुक केले आहे. योजनेला शंभर दिवस पूर्ण झाल्यानंतर ६ लाखांहून अधिक रुग्णांना मिळालेल्या उपचारांचा उल्लेख करत हे कौतुकास्पद असल्याचे सांगत आश्चर्य व्यक्त केले आहे. या योजनेच्या सफलतेसाठी त्यांनी मोदी सरकारवर शुभेच्छांचा वर्षावही केला आहे.

 
 

त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि, आयुषमान भारत या योजनेच्या शंभर दिवसांच्या यशस्वी वाटचालीबद्दल भारत सरकारचे अभिनंदन... हे पाहून मला आश्चर्य होत आहे कि, शंभर दिवसांत सहा लाख लोकांनी या योजनेतून उपचार घेतला.

 

केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी २ जानेवारी रोजी ट्विट करत, “आयुषमान योजनेतील शंभर दिवसांमध्ये ६ लाख ८५ हजार लाभार्थ्यांनी आयुषमान योजनेअंतर्गत मोफत उपचार केल्याचे म्हटले. लाभार्थ्यांची संख्या वाढत आहे. या ट्विटला रिट्विट करत त्यांनी मोदी सरकारचे अभिनंदन केले. आयुषमान योजनेने नवा मैलाचा दगड पार केल्याचे मत नड्डा यांनी व्यक्त केले होते.

 

मोदी सरकारने २०१८ मध्ये आयुषमान योजनेची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ डिसेंबर रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त २५ डिसेंबर रोजी ही योजना लागू केली होती. या अंतर्गत पाच लाखांचे मोफत उपचार करण्याची सुविधा देण्यात आली आहे. 

 

आयुषमान भारत योजनेअंतर्गत बुधवार, दि. १५ जानेवारीपर्यंत साडेआठ लाख रुग्णांनी या योजनेअंतर्गत उपचार घेतले आहेत.

– डॉ. इंदू भूषण, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुषमान भारत योजना

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/