पाचोर्‍याला सचखंड, चाळीसगावला महानगरीला थांबा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2019
Total Views |

प्रवाशांना संक्रातनिमित्त भेट : खा. ऐ. टी. नाना पाटील यांच्या प्रयत्नांतून यश

 
जळगाव, १६ जानेवारी
चाळीसगाव व पाचोरा येथील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. खासदार ऐ. टी. नाना पाटील यांच्या प्रयत्नांतून पाचोर्‍याला सचखंड तर चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर महानगरी थांबा देण्यात रेल्वे मंत्रालयाने ग्रीन सिग्नल दिला आहे. महीनाअखेर दोन्हि गाड्यां थांबायला लागतील असे खासदार ऐ. टी.पाटील यांनी सांगीतले.
 
 
चाळीसगाव व पाचोरा रेल्व स्थानकावर गेल्या २-३ वर्षात अनेक महत्वाच्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना थांबे मिळाले आहे. आता त्यात आणखी भर पडली असून खासदार ऐ. टी.नाना पाटील यांच्या प्रयत्नातून पाचोरा रेल्वे स्टेशनला सचखंड एक्सप्रेस चा तर चाळीसगाव ला महानगरी चा थांबा मिळणार आहे. खासदार ऐ.टी.नाना पाटील यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन प्रवांशाची हीणारी गैरसोय दुर करण्यासाठी या गाड्यांना थांबा देण्यासाठी विनंती केली होती. त्यानुसार रेल्वे विभागाने या गाड्यांच्या थांब्याला ग्रीन सिग्नंल दिला आहे. दोन्ही गाड्यांना महीना अखेर प्रर्यंत थांबा मिळणार असल्याचे खासदार ऐ. टी.पाटील यांनी सांगीतले. दरम्यान दोन्ही तालुक्यातील रेल्वे प्रवाशी संघटनाची या गाड्याना थांबा मिळण्याची मागणी होती. यापुर्वी चाळीसगावला सचखंड तर पाचोर्यात महानगरी चा थांबा मिळविण्यात खासदार पाटील यांना यश आले आहे. सचखंड व महानगरी ला थांबा मिळाल्याने प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. लवकरच खासदार ऐ. टी.पाटील, चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील यांच्या उपस्थितीत यां थाब्यांना हीरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे.
 
 

' राजधानी’ ला जळगाव थांबा
नव्याने सुरू होणार्या cते नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेसला खासदार ऐ.टी.पाटील यांनी जळगावला थांबा मिळण्याबाबत रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांच्या मागणीनुसार राजधानी एक्सप्रेसला जळगाव थांबा ला हीरवा झेंडा मिळवण्याचे चिन्हे आहेत. राजधानी एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनंस वरून कल्याण, नाशिक, जळगाव रेल्वे स्टेशनला थांबा मिळण्याचे संकेत आहे. त्यामुळे दिल्लीला व उत्तर भारतात जाणे वेगवान होणार आहे.
 
 
प्रतिक्रिया
प्रवाशांच्या मागणीनुसार चाळीसगावला महानगरी व पाचोरा ला सचखंड एक्सप्रेसचा थांबा रेल्वे विभागाने मान्य केला आहे. याचे मोठे समाधान आहे. तर नव्याने सुरू होणार्या राजधानी एक्स्प्रेसला ही जळगाव येथे थांब्याची मागणी केली आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
-ऐ.टी.पाटील खासदार
 
@@AUTHORINFO_V1@@