'महाराष्ट्र मिसेस आयकॉन ग्रेसिअस'मध्ये 'निर्मल रक्षा'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2019
Total Views |
 

नाशिक : समीज्ञा फाऊंडेशनआयोजित 'महाराष्ट्र मिसेस आयकॉन ग्रेसिअस २०१९' या स्पर्धेची अंतिम फेरी मँगो ट्रीयेथे मोठ्या दिमाखात पार पडली. एकूण १२० स्पर्धकांपैकी तीन वयोगटातील ६० स्पर्धक अंतिम फेरीत सहभागी झाल्या. स्पर्धेत केवळ बाह्यसौदर्य गुणांना महत्त्व न देता आंतरिक गुणांना मह्त्व देण्यात आले. २० ते ७० वयोगटातील महिलांनी या स्पर्धेचा आनंद घेतला.

या स्पर्धेची विजेती जान्हवी गायकवाड सुपर ग्रुप, प्रिया सुरते गोल्ड ग्रुप, माधवी अरेकर क्लासिक ग्रुप, तर वेदिका धाराव सुपर ग्रुप, सपना जोशी गोल्ड ग्रुप, नीतू स्टुडंट क्लासिक ग्रुप या फर्स्ट रनरप ठरल्या. नेहा वाघ सुपर ग्रुप डॉ. काजल माळी गोल्ड ग्रुप डॉ मीनल कोटकर क्लासिक ग्रुप, या सेकंड रनरप ठरल्या, दर्शना थोरात, कुमुदिनी कुलकर्णी, शुभांगी पवार यांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले आहे. वृषाली शेख या दिव्यांग महिलेला मिसेस इंस्पिरेशनल पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

 

सपना जोशी ठरली सोशल 'मीडियाक्विन'

 या स्पर्धेतील फर्स्ट रनर अप सपना जोशी यांना सोशल मीडियाक्विन म्हणून घोषित करण्यात आले. मी जगभरात विविध देशांना भेटी दिल्या आहेत. पण हा सन्मान माझ्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे”, असे त्या म्हणाल्या. महिलांना व्यासपीठ निर्माण करून देणे हा निर्मल रक्षा अभियानचा मूळ हेतू होता, असे फाऊंडेशनच्या सचिव प्रज्ञा भोसले तोरस्कर म्हणल्या.
 

 
 

परीक्षक म्हणून गीता कास्टलीनो मुंबई अभिनेत्री श्वेता सिन्हा, रुपाली तोरणे यांनी काम पाहिले. तर, मिनल वानखेडे, अरुणा पुरोहित, सुहासनी मालदे, पल्लवी धर्माधिकारी, गुंजन पुरोहित, स्वाती रानालकर, प्रियांका घोगरे, मनीषा बागुल, ऋचा शाह, अँम्बसेडर उपस्थित होत्या. अनुराधा शिंदे, मुंबई या प्रमुख पाहुण्या म्हूणन उपस्थित होत्या. शोची कोरिओग्राफी संज्योति देवरे यांनी केली. अध्यक्ष समीर तोरस्कर, सुनिल भोसले, उदय मांढरे, दीपा मांढरे, अर्चना देवरे, तब्बू शेख, पूनम पवार, पराग साधना, अमृता खरोटे, वैशाली ठाकरे, मनवी शिंदे, अनु राणा, मंजू पवार, राधिका श्रीदेवी, भावना आमिष, मोहित नूपुर यांचे सहकार्य लाभले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@