ऑनलाईन सेलवर सुट मिळवण्याची शेवटची संधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2019
Total Views |
 

मुंबई : केंद्र सरकारने ई-कॉमर्स कंपन्यांच्या घसघशीत ऑफर्सला चाप लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता ऑनलाईन खरेदी करणाऱ्यांना या ऑफर्सचा लाभ घेण्याची शेवटची संधी आहे. २० जानेवारीपासून सुरू होणाऱ्या अ‍ॅमेझॉनचा ग्रेट इंडियन सेल हा शेवटचा ठरू शकतो. केंद्र सरकारने ई-कॉमर्स क्षेत्रासाठी जाहीर केलेल्या नव्या धोरणांमुळे फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉन कंपन्या ऑनलाईन विक्री करताना अशा ऑफर्स आणू शकणार नाहीत. १ फेब्रुवारीपासून ही नवी नियमावली लागू होणार असल्याने कंपन्या विक्रीवाढ आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यापूर्वीच ऑफर्स देत आहेत.

 

अ‍ॅमेझॉनवर २० जानेवारी रोजी जाहीर केलेल्या या चार दिवसांच्या सेलमध्ये अ‍ॅपल, वनप्लस, शाओमी, ऑनर, रिअलमी, सॅमसंग आदी ब्रॅण्डचे स्मार्टफोन्स स्वस्तात मिळणार आहेत. कंपनीने जाहीर केलेल्या माहितीनुसार, प्युमा, रेड टेप, बाटा, फास्टट्रॅक आदी मोठ्या ब्रॅंण्डसवर घसघशीत सुट मिळू शकणार आहे.

 

नव्या धोरणांनुसार, ई-कॉमर्स कंपन्या असलेल्या ग्रोफर्स, बिगबास्केट, फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉनवर मोठ्या ऑफर्ससह कॅशबॅकही दिली जाते, त्यामुळे ग्राहक अशा ऑफरकडे आकर्षित होत अशा कंपन्यांची प्राईम सेवाही घेत होते. मात्र, नव्या धोरणामुळे आता या सर्व ऑफर्स ग्राहकांना मिळू शकणार नाहीत. सध्यास्थितीत असलेला माल खपवण्यासाठी ग्राहकांना मोठी सुट दिली जाऊ शकते.

 

नवा तोडगा शोधणार ?

 

ऑनलाईन कंपन्या त्यांच्या व्यावसाय विस्तारासाठी या धोरणावरही तोडगा काढू शकतात, असा अंदाज सध्या व्यक्त केला जाऊ शकतो. केवळ ऑफरऐवजी ग्राहक टीकवून ठेवण्यासाठी अन्य पर्यायी मार्गाने ग्राहकांना आकर्षित केले जाऊ शकते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@