
कुंभमेळ्याच्या परिसरात असलेल्या सेक्टर १६ मध्ये दिगंबर आखाड्यात ही भीषण आग लागली. सिलेंडरमधील गॅस गळतीमुळे ही आग लागली असल्याचे कारण समोर आले आहे. सिलेंडरचा स्फोट होताच अनेक तंबू या आगीच्या कचाट्यात सापडले. अशी माहिती कुंभमेळ्यातील एका साधूने दिली. या भीषण आगीवर वेळीच नियंत्रण मिळविण्यात आले असून त्यानंतर आजूबाजूचा परिसर रिकामी करण्यात आला आहे.
आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अशी माहिती कुंभ मेळ्याचे सुरक्षा अधिकारी आशुतोष मिश्रा यांनी दिली. जगभरातून मोठ्या संख्येने साधू या कुंभमेळ्यासाठी प्रयागराजमध्ये दाकल झाले आहेत. प्रयागराजमध्ये त्यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली आहे. त्रिवेणी संगमावर साधूंच्या वेगवेगळ्या आखाड्यांचे तंबू उभारण्यात आले आहेत.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/