भिवंडीमधील बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2019
Total Views |



ठाणे - भिवंडीमधील शेतकऱ्यांनी बुलेट ट्रेनच्या संयुक्त जमीन मोजणीस होकार दिला आहे. त्यामुळे आता पुढील प्रक्रियेस वेग येणार आहे. शुक्रवारी भिवंडी प्रांत कार्यालयात प्रांताधिकारी डॉ. मोहन नळदकर यांच्यासमवेत झालेल्या चर्चेत शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी संयुक्त जमीन मोजणीस होकार दिला. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिलेल्या सूचनेनुसार गेल्या काही महिन्यांपासून बुलेट ट्रेनच्या भूसंपादनासंदर्भात शेतकऱ्यांशी जिल्हा प्रशासनाची सातत्याने चर्चा सुरु होती.

 

शेतकऱ्यांनी काही अटी कायम ठेवून संयुक्त जमीन मोजणीस होकार दिल्याने १७ ते १९ जानेवारी दरम्यान अंजूर, भरोडी, हायवेदिवे येथील १२९ खातेधारक शेतकऱ्यांच्या ६०.६४ हेक्टर जमिनीची मोजणी करण्यात येणार आहे. शेतजमीन बाधित शेतकऱ्यांना मोबदला ठरविण्यासाठी नेमलेल्या शासकीय समितीमध्ये प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांचा प्रतिनिधी नेमावा, बुलेट ट्रेन मार्गिकेला समांतर असलेला सर्विसरोड भरोडी येथे संपतो. त्यामुळे प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्गिकेला समांतर असलेल्या सर्व्हिस रोडला भरोडी ते म्हातारडी डोंबिवली यांना जोडणारा सर्व्हिस पूल द्यावा.

 

तसेच प्रस्तावित बुलेट ट्रेनसाठी सुरई, भरोडी व अंजूर या भागात कारशेड प्रस्तावित आहे. या कारशेडमध्ये स्थानिक भूमीपुत्रांना केवळ मजूर म्हणून नोकरी न देता त्यांना कौशल्यकामाची नोकरी द्यावी. त्यासाठी अप्रशिक्षीत मुलांना स्वखर्चाने प्रशिक्षीत करून त्यांना प्राधान्याने सामावून घ्यावे, अशा काही प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. बैठकीस हायस्पीड ट्रेनचे श्री नायक, उप अधीक्षक भूमी अभिलेख प्रमोद ठुबे आदींची उपस्थिती होती.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@