टीजेएसबी इंदिरानगर शाखेत उलघडला देशपरदेशातील नोटांचा खजिना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2019
Total Views |



ठाणे : ५० सेंटीमीटरची नोट, बोलणारे नाणे, सोन्या-चांदीची नाणी, राणीचे चित्र असलेली नोट अशा विविध प्रकारच्या १९३ देशांच्या नाणी, नोटा आणि स्टॅम्पचा अभूतपूर्व खजिना टीजेएसबी सहकारी बँकेच्या इंदिरानगर शाखेच्या वर्षपूर्ती निमित्ताने नागरिकांसमोर उलघडला. नोटा व नाणे अभ्यासक संजय जोशी यांच्या १२६ व्या नोटांच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने ठाणेकरांनी नोटांचा हा रंजक प्रवास अनुभवता आला.

 

टीजेएसबी सहकारी बँकेच्या इंदिरानगर शाखेच्या माध्यमातून बँकीग व सामान्य नागरिकांच्या उपयुक्त गरजा लक्षात घेऊन विविध उपक्रम राबविले जातात. याच उपक्रमाचा भाग म्हणून शाखेच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने नाणे संग्राहक संजय जोशी यांच्या विविध देशांच्या नाणे व नोटांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. बँकेचे अध्यक्ष मेनन, रा.ज. ठाकूर महाविद्यालयाचे संचालक मंगेश ठाकूर, वागळे इस्टेट पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक, प्रशांत कॉर्नरचे प्रशांत सकपाळ यांच्या उपस्थित राष्ट्रीय युवा दिनानिमित्ताने दिवसभर नोटांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

 

१ हजाराहून अधिक नागरिक व विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली. बँक ऑफ महाराष्ट्रातील निवृत्तीनंतर नाणे व नोटा संग्रहाचा आपला छंद जोपासत संजय जोशी यांनी जवळपास जगातील सर्व १९३ देशांच्या नोटा, नाणे व स्टॅम्प पेपर याचा संग्रह केला. संग्रहीत केलेल्या या बहुमोल संग्रहाचे भारतासह ८ देशांमध्ये प्रदर्शन भरवले. इंदिरानगर शाखेतील भरलेले संजय जोशी यांचे हे १२६ वे प्रदर्शन होते. सातवाहन काळातील गौतमीपुत्र शतकर्मी राजाच्या काळातील टीकली एवढे सप्तधातूतील नाणे, पहिला महायुद्धातील आणीबाणीच्या काळातील अवघ्या ५० सेंटीमीटरची मोरोक्को देशाची नोट याच्यासह, दहा विविध धातूंमध्ये असलेली नाणी, बोलणारे नाणे, अशी निरनिराळी आकर्षण या नोटांच्या प्रदर्शनात नागरिकांना पाहायला मिळाली.

 

३० देशांच्या नाण्यांचे संकलन

 

प्रदर्शनात सध्या अस्तीत्वात नसलेल्या ३० देशांच्या नाणी व नोटांचे संकलन देखील होते. तर ब्रिटनच्या राणीचे फोटो असलेल्या ३४ देशांच्या नोटा प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. अभूतपूर्व असलेल्या या प्रदर्शनात अनेक नागरिकांनी आपल्या संग्रहात असलेल्या नोटा व नाणी यांच्याबाबतीतची माहीती देखील प्रदर्शन ठिकाणी संजय जोशी यांच्याकडून घेतली. या प्रदर्शनाला नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला अशी माहीती इंदिरा नगर शाखेचे व्यवस्थापक समीर जोशी यांनी दिली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@