...आणि विनोद तावडे उतरले कब्बडीच्या मैदानात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jan-2019
Total Views |



पुणे - खेलो इंडिया युथ गेम्स आयोजन समितीतर्फे नॅशनल युवा को-ऑपरेटिव्ह सोसायटीने स्पोर्टस् एक्स्पो आयोजित केला होता. या स्पोर्टस् एक्स्पोमधील विविध खेळांमध्ये राज्यांचे क्रीडामंत्री विनोद तावडेंनी गुरुवारी सहभाग घेतला. यावेळी थेट मैदानात जाऊन तावडेंनी विद्यार्थ्यांसोबत कबड्डीचा आनंद लुटला.

 

केंद्र आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने म्हाळुंगे बालेवाडीमध्ये शिवछत्रपती क्रीडानगरीमध्ये अ‍ॅथलेटिक्स ट्रॅकच्या मागील बाजूस असलेल्या मैदानामध्ये हा एक्स्पो भरवण्यात आला आहे. एक्स्पोच्या उद्घाटनप्रसंगी नॅशनल युवा को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.चे राजेश पांडे, क्रीडा सहसंचालक नरेंद्र सोपल, क्रीडामंत्र्यांचे सहाय्यक श्रीपाद ढेकणे, आशिष पेंडसे, खेलो इंडियाचे माध्यम समन्वयक रवींद्र नाईक यांसह क्रीडा अधिकारी उपस्थित होते.

 

स्पोटर्स एक्स्पोमध्ये ६० विविध प्रकारचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. खेळाडूंचे करियर, विकास आणि तंत्रज्ञानाविषयी यामध्ये माहिती देण्यात येत आहे. याशिवाय खेळाडूंना आहारविषयक आणि फिटनेससंबंधी सेमिनारदेखील आयोजित करण्यात आली आहेत. आहारविषयक माहिती देणारे आहारतज्ज्ञ यामध्ये खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय ऑलिम्पिकविषयी माहिती देणारे प्रदर्शनही आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना खेळाचा आनंद घेता यावा, याकरीता धर्नुविद्या, लगोरी, रिले, वॉल क्लायम्बिंग, गोटया, फुटबॉल यांसारखे खेळ आयोजित करण्यात आले आहेत. हे प्रदर्शन दिनांक २० जानेवारीपर्यंत विविध शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी तसेच क्रीडाप्रेमींना पाहण्याकरीता खुले राहणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@