ईशान्य भारताचे भाग्य बदलणारा बोगीबिल पूल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jan-2019   
Total Views |

 


 
 
 
२५ डिसेंबर २०१८ रोजी आसाममध्ये उद्घाटन झालेल्या बोगीबिल पुलाने ईशान्य भारतातील प्रवासी तसेच मालवाहतुकीला गती प्राप्त झाली आहे. अशा या महत्त्वाकांक्षी पुलाची सविस्तर माहिती देणारा हा लेख...
 

आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीवरील दक्षिणेकडील दिब्रुगढ शहर ते उत्तरेकडील धेमाजी अशा लोहमार्ग व रस्ता असलेल्या ४.९४ किमी लांब पुलाचे काम नरेंद्र मोदी सरकारने पूर्णत्वास आणले. २५ डिसेंबर, २०१८ रोजी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनाच्या व सुशासन दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महत्त्वाच्या पुलाचे उद्घाटन केले. ब्रह्मपुत्रेवरचा हा पाचवा पूल असेल व त्याला ‘बोगीबिल पूल’ या नावाने ओळखले जाते. या पुलाच्या कामाचे कोनशिला अनावरण माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी २२ जानेवारी, १९९७ ला पार पाडले होते. त्यानंतर पाच वर्षांनी माजी पंतप्रधान वाजपेयींनी पुलाच्या बांधकामाचे २००२ मध्ये औपचारिक उद्घाटन केले. म्हणजेच, या पुलाच्या एकूण कामासाठी थोडीथोडकी नव्हे तर तब्बल २१ वर्षे लागली.

 

बोगीबिल पुलाची संरचना

 
.९४ किमी लांब असा भारताची ईशान्य सीमा रेल्वेने जोडणारा (Northeast Frontier Railway) बोगीबिल पुलाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प. तिन्सुकिया जिल्ह्यातील धोला व सादिया ही ठिकाणे जोडण्याकरिता बांधलेला हा लांब पूल आतापर्यंत भारतात बांधलेल्या पुलांमध्ये सर्वात लांब पूल ठरतो. परंतु, बोगीबिल पूल ब्रह्मपुत्रा नदीवरचा लोहमार्ग-रस्ता अशा जोड दळणवळणाकरिता पांडू-सरईघाट व गोलपारा-जोगीघोपा जोडपुलानंतर असा तिसरा पूल बनला आहे. हा पूल जोड दळणवळणासाठी देशातील सर्वात लांब पूल ठरला आहे. आसाम राज्य सरकार व रेल्वेची तांत्रिक संस्था ‘राईट्स’ यांनी पुलाकरिता सल्लागार नेमून टॉप नॉच इंजिनिअर्सकडून भूमी-तांत्रिक निरीक्षणानंतर पुलाची संरचनात्मक कामे व नकाशे बनविले. पुलाचे ठिकाण भूकंप-प्रवृत्तीच्या भागामध्ये येत असल्याने भूकंपरोधक संरचनेचा त्यात अंतर्भाव केलेला आहे. भूकंपाच्या सात रिश्टर स्केल दर्जापर्यंत जरी आपत्ती आली तरी, पुलाला पोलादी वेल्ड व काँक्रिट बांधकामाची युरोपियन दर्जाची संरचना असल्याने पूल १२० वर्षे टिकून (serviceable period) राहू शकतो. हा पूल म्हणजे एक अभियांत्रिकी कमालीची चीज आहे.
 
बांधकाम करणाऱ्या कंपन्यांमध्ये गॅमन इंडिया कंत्राटदारांनी ४२ नदीत पायाविहिरींची व पाण्यातील कामे केली आहेत. आसाममधल्या भार्तिया इन्फ्रा प्रोजेक्ट्सनी गॅमनचे उपकंत्राटदार म्हणून पुलाच्या कामाकरिता खडी-रेतीसारखा माल पुरविण्याचे काम, सुरक्षाभिंती बांधणे व नदीच्या दक्षिणेकडील भरावाचे काम केले. एस्सार स्टीलने पुलाकरिता २० हजार टन पोलाद पुरविले आणि समुदाय कंपनीतील हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी (HCC), जर्मनीमधील डीएसडी ब्राऊकेनबाऊ आणि व्हीएनआर इन्फ्रास्ट्रक्चरने मिळून पुलाचे जमिनीवरील बांधकाम (superstructure) पार पाडले. या कामाला एकूण तीन लाख सिमेंटच्या बॅगा, ८० हजार टन पोलाद व २२ लाख घनमीटर व्याप्तीचे दगड लागले. पाण्यातील पायाची रूंदी ६९ मीटर आहे. पुलाच्या दोन्ही बाजूस ८३२ मीटर लांब व्हायाडक लावले. पुलाच्या सुरुवातीचे स्थूल मूल्य १,७६७ कोटी रुपये इतके जरी असले तरी, शेवटी पुलाचा खर्च तिप्पट जास्त म्हणजे तब्बल ५,९६० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. कुठल्याही प्रकल्पाला अमर्याद विलंब झाला की, प्रकल्पाची किंमत कशी वाढत जाते याचे हे उत्तम उदाहरण आहे. या विलंबाला सगळ्या बांधकाम व संरचना कंपन्या, रेल्वे, स्थानिक संस्था आणि निवडून आलेले स्थानिक आमदार, खासदार, त्यावेळचे आसाम राज्य सरकार, केंद्र सरकार व संबंधी मंत्री इत्यादी लोकं जबाबदार आहेत.
 

पूल बांधणीकरिता आलेल्या अडचणी

 

हा पूल बांधण्यास २००२ मध्ये प्रत्यक्ष सुरुवात झाली असली तरी, एकूण २०० महिन्यांचा काळ लागला. कारण, या भागात वर्षातील आठ महिने भरपूर पाऊस पडत असतो. पावसाळा सोडून वर्षाकाठी फक्त नोव्हेंबर ते मार्च अशा चार कोरड्या महिन्यातच बांधकाम करता येतेबोगीबिल पुलाच्या संरचनेत बदल केला गेला व ४.३१ किमीच्या जागी आता ४.९४ किमी लांब पूल तयार झाला आहे. वरच्या बाजूला जाण्याकरिता एका मार्गिकेऐवजी आता तीन मार्गिकांचा रस्ता केला आहे. आसाममधील अनेक राजकीय व सामाजिक संस्था त्यांच्या विविध मागण्यांकरिता काम बंद करणे व कोंडमारा करणे (blockade) चालू असायचे. त्यात विद्यार्थी समिती ते बिहु समिती असायच्या, ज्यात कंपनीने नोकरीवरून काढून टाकलेले लोक सहभागी होत होते. या भागातील निवडून आलेले खासदार व आमदार हे पुलाच्या कामात काही रस दाखवत नव्हते. हा आसामचा भाग दुर्गम व कमी मनुष्यबळाचा असल्याने कुशल कामाकरिता माणसे मिळण्यास संकटे येत होती.

 

बोगीबिल पूल महत्त्वाचा का?

 

हा पूल आसाम व अरुणाचल प्रदेशाच्या सीमेपासून फक्त २० किमी अंतरावर आहे व कोलिया भोमोरा सेतू तेझपूरला पर्यायी म्हणून आसामच्या व अरुणाचल प्रदेशाच्या वरच्या अंगाकडून जाणाऱ्या ५० लाख लोकांना सेवा देऊ शकेल. भव्य असे दिब्रुगड रेल्वे स्थानक बांधले जाईल व रांगिया व मुर्कोंगसेलेक रेल्वे मार्ग चॉलखोवा आणि मोरानहाट स्थानकांकडून जोडले जातील व धमालगाव ते सिसीबोरगाव हा रेल्वे मार्ग ब्रॉडगेजमध्ये बदलला जाईलबोगीबिल पूल बांधणे, हे आसामच्या १९८५च्या ठरलेल्या नियमाप्रमाणे होत आहे. भारत सरकारने नवव्या पंचवार्षिक योजनेमधील १९९७-९८च्या पंतप्रधान देवेगौडांच्या काळात हे काम मंजूर केले होते. पंतप्रधान मनमोहन सिंगांच्या काळात २००७ मध्ये या पुलाला सरकारने राष्ट्रीय पुलाचा दर्जा दिला होता. ७५ टक्के पुलाचा खर्च केंद्राच्या अर्थ खात्याने व उर्वरित खर्च रेल्वे खात्याने सांभाळावा असे ठरले होते.

 

दिब्रुगड ते इटानगरपर्यंत (नहारलगुन) या बोगीबिल रेल्वे पुलामुळे ७०५ किमी अंतर कमी होईल. दिब्रुगड ते ब्रह्मपुत्रेच्या उत्तरेकडे पोहोचण्याकरिता कमी अंतराचे व पर्यायी रेल्वे मार्ग ठरणार आहे. प्रवासाचे १० तास वाचणार आहेत. ईशान्येकडील नागरिकांचे विशेषत: आसामवासीयांचे या पुलामुळे एक मोठे स्वप्न २१ वर्षांनी पुरे झाले आहेपूल नव्हता तेव्हा अरुणाचल प्रदेशात जाण्याकरिता दिब्रुगडला जाणे व तेथून बोगीबिल घाटाकडून जलमार्गाने जावे लागायचे. असा वळसा घालून प्रवास व्हायचा व प्रत्येकी एक-एक तास खर्च व्हायचा. १७० किमी प्रवासाऐवजी आता फक्त पाच किमींहून कमी अंतर प्रवास करावा लागेल. पावसाळ्यात तर जलमार्ग बंद पडायचे. आता पुलामुळे २४ तास, १२ महिने प्रवास करता येईल. दिब्रुगड-दिल्ली अंतर आता फक्त १७० किमी होईल. ईशान्येकडील क्षेत्रांकरिता राष्ट्रीय संरक्षणाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे उचलले गेले आहे व भारत सरकारने एक महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहेईशान्य रेल्वे खात्याने बोगीबिल पूल बांधल्यामुळे येथे फार मोठी कामगिरी केली आहे. काही उरलेल्या मार्गांचे ब्रॉडगेजमध्ये बदल करून त्या भागात आता १०० टक्के ब्रॉडगेज रेल्वे धावणार आहेत. या भागाकरिता सध्या ४३ रेल्वे प्रकल्प कार्यान्वित होत आहेत व त्या सर्वाचे प्रकल्प मूल्य ९८ हजार कोटी रुपये आहे.२०२२ सालापर्यंत आसामसारख्या सात बहिणी राज्यांच्या राजधान्या असलेली शहरे रेल्वेमार्गाने जोडली जातील.

 
या पुलाचे १२५ मीटर लांब अंतराचा एक तुकडा (span) असे एकूण ३९ तुकडे आहेत. जमिनीवरील बांधकाम पोलादी वेल्डिंगचे व काँक्रिटचे आहे. डबल रेल्वे मार्ग ब्रॉडगेजचा (१.६७६ मीटर लांब) आहे व त्यावर रस्त्याचे काम केलेले आहे. हा जोड दळणवळणाचा पूल चीनच्या सीमेहून जवळच्या स्थानापर्यंत पोहोचणारा आहे. पुलाची संरचना रणगाड्यांच्या हालचाली व जेट विमाने उतरू शकतील, अशा ताकदीचा बनविला आहे. त्यामुळे देशाचे संरक्षण करण्यासाठी हा पूल उपयोगी व महत्त्वाचा टप्पा (milestone) ठरणार आहे. सीमावर्ती भागात अरुणाचल प्रदेश येथील सैनिकी तळावर अत्याधुनिक शस्त्रसाठे कमी वेळात उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनेही हा बोगीबिल जोड उड्डाणपूल फार उपयुक्त ठरणार आहे. या आसामच्या दिब्रुगड जवळच्या भागात गेल्या ६० वर्षांहून अधिक काळामध्ये भूकंप, जलपूर इत्यादी संकटे आली, ती आता या पुलावरील दळणवळणाच्या सोईने पुष्कळ कमी होतील. दिब्रुगड क्षेत्र आता पूर्वीच्या स्थितीत पोहोचून तेथे मोठा विकास साधला जाईल. ते पूर्ववत बनून विद्येचे माहेरघर व आरोग्य केंद्र म्हणून बनेल. हे क्षेत्र ऑईलचे व गॅसचे केंद्र आहे, त्यात आता वाढ होऊ शकेल. तेथे २०० हून अधिक चहाचे मळे, अनेक तऱ्हेचे वृक्ष व मळे व खाणी आहेत. त्या सर्व उद्योगांना बोगीबिल पुलामुळे राजकीय, सामाजिक व आर्थिक क्षेत्रांना मोठी चालना मिळेल.
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/


 
@@AUTHORINFO_V1@@