लैंगिक शोषण होणे ही सामान्य गोष्ट

    08-Sep-2018
Total Views |



 

 

केरळ : डेमोक्रेटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या एका महिला नेता हिने काही दिवसांपूर्वी माकपचे आमदार पी.के. शशी यांच्यावर आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर राज्यात नवीन राजकारण सुरु झाले. हे सारे सुरु असतानाच केरळच्या राज्य महिला आयोगाच्या प्रमुख एमसी.जोसेफिन यांनी याप्रकरणी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
 

‘लैंगिक शोषण होणे ही सामान्य गोष्ट आहे’. असे वक्तव्य एमसी जोसेफिन यांनी पी.के.शशी यांची बाजू सावरताना केले. एवढेच नव्हे तर याप्रकरणी बोलताना त्या म्हणाल्या की आपण माणूस आहोत माणसाकडून चुका होतच असतात. यात नवीन काही नाही. तसेच याप्रकरणी पीडित महिलेची तक्रार नोंदविण्यास महिला आयोगाने नकार दिला आहे. याप्रकरणी पुरेसे पुरावे नसल्याने ही तक्रार नोंदवण्यात आली नसल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले. तर माकपाचे आमदार पी.के. शशी यांनी स्पष्टीकरण देत हे आपल्या विरोधातील कारस्थान असल्याचे सांगितले.

 

यामुळे केरळमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महिला आयोगाने घेतलेल्या भूमिकेमुळे व लैंगिक शोषणाबाबत खुद्द आयोगाच्या प्रमुखांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता केरळमधील महिलांनी कुणाकडे दाद मागावी असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/