५०० एसटी बस खरेदीला निधी मिळणार

    07-Sep-2018
Total Views |



अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

 


मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला ५०० नवीन बस खरेदीसाठी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. लालपरी सर्वसामान्यांची लाईफलाईन असून लाखो लोक तिच्यातून प्रवास करतात. त्यामुळे एसटी प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा यासाठी राज्य सरकार तत्पर असून त्यामुळे या नवीन खरेदीला मंजुरी देण्यात येणार असल्याचेही अर्थमंत्र्यांनी सांगितले.

 
 
 

अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी याविषयी अधिक माहिती देताना सांगितले की, या ५०० बस खरेदीसाठी लागणाऱ्या निधीपैकी, १२.५ कोटींचा निधी लवकरच उपलब्ध करून दिला जाईल तसेच उर्वरित निधी येत्या अधिवेशनाच्या काळात उपलब्ध करून देण्यात येईल. दरम्यान, बस स्थानके सुंदर आणि स्वच्छ ठेवण्यासाठी महामंडळाने पुढाकार घ्यावा असे आवाहन देखील त्यांनी केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/