राज कांबळे यांची आयआयएम कोझिकोडेच्या प्रशासक मंडळावर नियुक्ती

    04-Sep-2018
Total Views |

 

 
 
 मुंबई : फेमस इनोव्हेशन्सचे संस्थापक आणि सी.सी.ओ. तसेच मायामी अॅड स्कूल, मुंबईचे संचालक राज कांबळे यांची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयम) कोझिकोडेच्या प्रशासक मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सदर प्रशासकीय मंडळाकडे असलेल्या जबाबदाऱ्यांमध्ये संस्थेच्या अभ्यासक्रमाबाबत निर्णय घेणे, संस्थेचा विस्तार व अन्य धोरणात्मक निर्णय घेणे आदी बाबींचा समावेश आहे.
 

नव्याने स्थापन झालेल्या आयआयएम अमृतसरच्या जडणघडणीच्या कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारीही याच प्रशासकीय मंडळावर आहे. मुरूगप्पा ग्रुपचे व्यवस्थापकीय अध्यक्ष व कोरोमंडल इंटरनॅशनल लि. चे अध्यक्ष ए. वेल्लायन हे या प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षपदी आहेत. तसेच, अपोलो टायर्सचे व्यवस्थापकीय संचालक ओंकार कंवर, टीटागढ वॅगन्सच्या वरिष्ठ उपाध्यक्ष विनिता बाजोरिया आदी मान्यवरांचा या प्रशासकीय मंडळात सदस्य म्हणून सहभाग आहे. राज कांबळे यांनी गेली २५ वर्षे जाहिरात क्षेत्रात मुंबई, लंडन, न्युयॉर्क आदी शहरांमध्ये काम केले आहे. पी अँड जी, युनिलिव्हर, स्टेला आर्टॉइज, जीएम आदी नामांकित कंपन्यांसोबत त्यांनी काम केले आहे. याखेरीज भारत सरकारच्या देशभरात वाय-फाय नेटवर्क निर्माण करण्याच्या प्रकल्पामध्येही एक थिंक टँकम्हणून राज कांबळे यांचा सहभाग आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/